आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राहुल गांधींचा मास्टर प्लान:काँग्रेस महापालिका निवडणुका स्वबळावर लढणार, राहुल गांधींसोबतच्या बैठकीनंतर नाना पटोलेंनी दिली माहिती

मुंबईएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • काँग्रस राज्यात नंबर एकचा पक्ष बनवायचा आहे

आघाडी सरकारमध्ये एकत्र असले तरीही काँग्रेस महाराष्ट्रामध्ये स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूक स्वबळावर लढवणार आहे. गेल्या काही दिवसांपासून काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले याविषयी घोषणा करत होते. आता त्यांच्या या घोषणांना काँग्रेस नेते राहुल गांधी यांनीही पाठबळ दिले आहे अशी माहिती पटोले यांनी बुधवारी दिली. महाविकास आघाडीच्या सरकारमध्ये असूनही काँग्रेस स्थानिक निवडणुका एकट्यानेच लढवणार असल्याचे पटोलेंनी सांगितले आहे. मंगळवारी कर्नाटकचे काँग्रेस प्रभारी एच. के. पाटील यांच्यासमवेत नाना पटोले यांनी राहुल गांधींची भेट घेऊन पक्षाच्या रणनीतीविषयी चर्चा केली होती.

याविषयावर बोलत असताना नाना पटोले म्हणाले की, 'महाराष्ट्रामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका काँग्रेस स्वबळावर लढणार आहे. हा निर्णय राहुल गांधी यांच्या सोबत झालेल्या बैठकीमध्ये घेण्यात आला. पक्षश्रेष्ठींचा हा निर्णय आहे तो सर्वांना पाळावा लागेल. यासोबतच कुठल्याही मंत्र्याच्या चुकीचा अहवाल काँग्रेस वरिष्ठांना गेलाला नाही असेही पटोले म्हणाले आहेत.

काँग्रस राज्यात नंबर एकचा पक्ष बनवायचा आहे
पुढे बोलताना पटोले म्हणाले की, 'महाराष्ट्रामध्ये काँग्रेस पक्षासाठी मी एक स्वप्न पाहिले आहे. काँग्रेस राज्यात एक नंबरचा पक्ष बनवायचा आहे. यासाठीच राहुल गांधी यांनी मास्टर प्लान दिलेला आहे. त्यावर आम्ही सगळे मिळून काम करणार आहोत. काँग्रेस पक्ष भक्कम करण्यासाठी आमची काहाही करायची तयारी असल्याचे पटोले म्हणाले. यासोबतच संघटनात्मक पातळीवर फेरबदल केले जाण्याचे संकेत त्यांनी दिले.

लोकसभा-विधानसभेविषयीही केले भाष्य
नाना पटोले हे गेल्या काही दिवसांपासून स्वबळाचा नारा देत आहे. आता त्यांनी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांविषयी आपल्या पक्षाची भूमिका स्पष्ट केली आहे. मात्र विधानसभा आणि लोकसभेविषयी अद्याप काही स्पष्ठ झालेले नाही. याविषयी बोलताना ते म्हणाले की, ही निवडणूक तीन वर्षांनंतर आहे. याविषयावर पक्षश्रेष्ठी निर्णय घेतील. महाविकास आघाडी सरकारच्या पक्षांमध्ये सुरू असलेल्या संघर्षांदरम्यान नाना पटोलेंनी केले आहे.

बातम्या आणखी आहेत...