आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मोठी बातमी:परिवहनमंत्री अनिल परबांना ईडीची नोटीस, 31 ऑगस्टला हजर होण्याचे आदेश; राऊत म्हणतात - 'क्रोनोलॉजी समजून घ्या, जन आशीर्वाद यात्रा संपताच ईडीची नोटीस'

मुंबई2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • अनिल परब यांना ईडीने नोटीस बजावल्यानंतर शिवसेना नेते संजय राऊत यांनी ट्विट करत माहिती दिली आहे.

परिवहनमंत्री अनिल परब यांना ईडीने नोटीस बजावली आहे. याविषयीची माहिती शिवसेना खासदार संजय राऊतांनी ट्विट करुन दिली. केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या जनआशीर्वाद यात्रा नुकतीच पूर्ण झाली. यापूर्वी राणे यांच्या मुख्यमंत्र्यांविषयीच्या आक्षेपार्ह वक्तव्यामुळे राज्यातील वातावरण तापलेले होते. दरम्यान आता परब यांना ईडीने नोटीस दिली आहे. येत्या मंगळवारी 31 ऑगस्टला परब यांनी ईडी कार्यालयात हजर रहावे असे समन्स बजावण्यात आले आहे.

अनिल परब यांना ईडीने नोटीस बजावल्यानंतर शिवसेना नेते संजय राऊत यांनी ट्विट करत माहिती दिली आहे. त्याने लिहिले की, 'शाब्बास! जन आशीर्वाद जत्रेची सांगता होताच अपेक्षे प्रमाणे अनिल परब यांना ई.डी.ची नोटीस बजावण्यात आली. वरचे सरकार कामाला लागले. भुकंपाचा केंद्रबिंदू रत्नागिरीत होता. परब हे रत्नागिरीचे पालकमंत्री आहेत. chronology कृपया समज लिजीये. कायदेशीर लढाई कायदयानेच लढू..जय महाराष्ट्र' ते म्हणाले आहेत.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याविषयी आक्षेपार्ह वक्तव्य केले यानंतर शिवसेनेने आक्रमक भूमिका घेतली आणि राणेंना अटक झाली. त्यांना अटक करण्यासाठी नेमके कोणी सांगितले होते, याची चर्चा सुरू असताना अनिल परबांची एक व्हिडिओ क्लिप व्हायरल झाली होती. यामध्ये ते अटकेविषयी बोलत असल्याचे दिसत होते. याच कारणामुळे आता भाजपने अनिल परबांविरोधात भूमिका घेऊन त्यांना नोटीस बजावली असल्याचा अंदाज वर्तवला जात आहे. अनिल परबांना 31 ऑगस्ट रोजी ईडी कार्यलयात चौकशीसाठी हजर राहण्यास देखील सांगण्यात आले आहे.

बातम्या आणखी आहेत...