आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

'ईडी'चा छापा:ईडीच्या कारवाईनंतर अनिल देशमुख यांची पहिली प्रतिक्रिया,  म्हणाले - 'ईडी, सीबीआयला माझे पूर्ण सहकार्य, चौकशीतून सत्य समोर येईल'

मुंबईएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक
  • मुंबईचे माजी पोलिस आयुक्त परमबीर सिंहांनी माझ्यावर जे खोटे आरोप केले होते

राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या मुंबई आणि नागपूर या ठिकाणच्या घरांवर आज ईडीने सकाळी छापेमारी केली. यांच्या ज्ञानेश्वरी, सुखदा या निवासस्थानी ईडीच्या पथकाने हे छापे टाकण्यात आले. आता या कारवाई संदर्भात आता स्वत: अनिल देशमुख यांनी माध्यमांसमोर येत आपली प्रतिक्रिया दिली आहे.

ईडीच्या छापेमारीविषयी बोलताना अनिल देशमुख म्हणाले की, 'सीबीआय, ईडी या प्रकरणाचा तपास करत आहेत. ईडीचे अधिकारी आज चौकशी करण्यासाठी आले होते. त्यांना पूर्ण सहकार्य मी केले आहे. यापुढे देखील असेच सहकार्य केले जाईल असे देशमुख म्हणाले.

माझ्यावर केलेले आरोप खोटे
पुढे बोलताना अनिल देशमुख म्हणाले की, 'मुंबईचे माजी पोलिस आयुक्त परमबीर सिंहांनी माझ्यावर जे खोटे आरोप केले होते, ते त्यांना पदावरून हटवण्यात आल्यानंतर केले. त्याने पोलिसआयुक्त असताना माझ्यावर आरोप केले नाहीत. त्यांच्या संशयास्पद भूमिकेमुळे आम्ही त्यांना आयुक्तपदावरून हटवले होते' असा पुनरोच्चारही देशमुखांनी केला आहे.

चौकशीतून सत्य समोर येईल
आपल्यावर लावण्यात आलेल्या 100 कोटी वसुलीच्या आरोपांविषयी बोलताना अनिल देशमुख म्हणाले की, 'अंबानींच्या घराबाहेर सापडलेले स्फोटके आणि मनसुख हिरेन हत्या प्रकरणाचा तपास एनआयएकडून केला जात आहे. दरम्यान ते अधिकारी तुरुंगात आहेत. अशा संशयास्पद भूमिकेमुळेच त्यांची बदली करण्यात आली होती. त्यानंतर त्यांनी माझ्यावर खोटे आरोप केले. सीबीआयकडून नियमानुसार त्याची चौकशी केली जात आहे. त्यातून सत्य जनतेसमोर येईलच. सीबीआय, ईडीला माझ्याकडून संपूर्ण सहकार्य करेल' असेही अनिल देशमुख म्हणाले आहेत.

बातम्या आणखी आहेत...