आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राष्ट्रवादीचे स्पष्टीकरण:पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार नदीचे दोन काठ, ते एकत्र येऊ शकत नाहीत; काँग्रेस-शिवसेनेला या भेटीची कल्पना होती : नवाब मलिक

मुंबईएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • पवार आणि फडणवीसांची भेट झाली नाही

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांची आज दिल्लीमध्ये बैठक झाली. जवळपास तासभर ही बैठक सुरू होते. या चर्चेनंतर राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली. या भेटीमध्ये नेमकी काय चर्चा झाली याचे अंदाज बांधणे सुरू झाले. तसेच राष्ट्रवादी आणि भाजप राज्यात एकत्र येणार का? अशा चर्चाही सुरू झाल्या. यावर नवाब मलिकांनी स्पष्टीकरण दिले.

ही भेट नवीन सहकार खाते आणि बँकिंग क्षेत्राच्या प्रश्नावर झाल्याचा दावा महाविकास आघाडीतील नेत्यांकडून करण्यात येत होता. दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते आणि अल्पसंख्याक विकास मंत्री नवाब मलिक यांनी पत्रकार परिषद घेत या भेटीविषयी खुलासा केला आहे. त्यांनी राजकीय वर्तुळात होत असलेल्या विविध चर्चांना पूर्णविराम देत म्हटले की, राजकारण हे विचारांच्या आधारावर असते. संघाचा राष्ट्रवाद आणि राष्ट्रवादी पक्षाच्या राष्ट्रवादात जमिन आसमानाचा फरक आहे. नदीचे दोन किनारे कधीच एकत्र येऊ शकत नाहीत हे सत्य आहे. भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र येणे अशक्य आहे.

मुख्यमंत्र्यांना कल्पना होती
यावेळी बोलताना नावब मलिक म्हणाले की, आजच्या बैठकीची मुख्यमंक्षी उद्धव ठाकरे यांना कल्पना होती. यासोबतच काँग्रेसच्या नेत्यांनाही कल्पना होती. कोरोना संकटाच्या काळात ज्या अडचणींचा समाना करावा लागत आहे, त्या विषयांवर या बैठकीत चर्चा झाली. लसीच्या योग्य पुरवठ्याबाबत या दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा झाली. मात्र, भ्रम निर्माण करण्याचं काम केले जात असल्याचा आरोप नवाब मलिकांनी केला आहे.

पवार आणि फडणवीसांची भेट झाली नाही
सध्या माजी मुख्यमंत्री आणि विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस हे देखील दिल्लीत आहेत. दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदींना भेटण्याच्या एक दिवसपूर्वी शरद पवार आणि देवेंद्र फडणवीस यांचीही भेट झाली असल्याचे वृत्त माध्यमांमध्ये होते. यावरही नवाब मलिकांनी स्पष्टकरण दिले आहे. ते म्हणाले की, फडणवीस आणि पवारांची भेट झालेली नाही. पंतप्रधानांच्या भेटीपूर्वी पवारांनी संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांचीही भेट घेतली होती. त्यावेळी माजी संरक्षणमंत्री ए. के. अॅन्टोनी आणि लष्करप्रमुखांचीही उपस्थिती होती. ही भेट देशाच्या संरक्षण विषयावर चर्चा झाली. दुसरीकडे नागरी सहकारी बँकांचे अधिकार कमी करुन रिझर्व्ह बँकेला जादा अधिकार देण्यात आले आहेत. याविषयीही पंतप्रधान मोदी आणि पवार यांच्यातील बैठकीत चर्चा झाली असल्याची माहिती मलिकांनी दिली.

बातम्या आणखी आहेत...