आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

महाविकास आघाडी एकत्र लढणार नाही?:स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका एकत्र लढवल्या पाहिजेत अशी कुठल्याही पक्षाची भूमिका नाही, नवाब मलिकांचे मोठे वक्तव्य

मुंबई4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीमध्ये स्थानिक लोक निर्णय घेतील आणि त्यानुसार पक्षाची भूमिका राहणार आहे

राज्यामध्ये शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसचे महाविकास आघाडी सरकार हे सत्तेत आहे. दरम्यान आगामी 14 महानगरपालिका आणि जिल्हा परिषदेच्या निवडणुकीमध्ये हे तिन्हीही पक्ष एकत्रित निवडणुका लढणार की नाही अशा चर्चा सुरू आहेत. दरम्यान काँग्रेसने स्वबळाचा नारा दिला आहेतच, यापाठोपाठ आता राष्ट्रवादीने देखील स्वबळाचा नारा दिला आहे. स्थानिक पातळीवर सरकट महाविकास आघाडी होणार नाही, स्थानिक परिस्थितीनुसार कोणासोबत जायचे यावर त्या पक्षासोबत आघाडी करण्यात येणार असल्याचे नवाब मलिकांनी स्पष्ट केले आहे.

याविषयी बोलताना नवाब मलिक म्हणाले की, राज्यात महाविकास आघाडीचे सरकार असले तरीही स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूका या एकत्र लढवल्या पाहिजेत अशी कुठल्याही पक्षाची भूमिका नसल्याचे वक्तव्य नवाब मलिकांनी केले आहे. त्यामुळे आगामी महापालिका निवडणुकांमध्ये महाविकास आघाडीतील घटकपक्ष एकमेकांविरोधात उभे राहणार असल्याचे पाहायला मिळू शकते.

स्थानिक परिस्थितीनुसार निवडणुका
यावेळी बोलताना नवाब मलिक म्हणाले की, स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीमध्ये स्थानिक लोक निर्णय घेतील आणि त्यानुसार पक्षाची भूमिका राहणार आहे. स्थानिक परिस्थितीनुसार या निवडणुका घेतल्या जातील. तिन्ही पक्ष विरुद्ध भाजप अशीच लढत सर्व ठिकाणी होणार नाही असेही मलिक म्हणाले. काही ठिकाणी भाजपचे अस्तित्व नाही. त्यामुळे काही ठिकाणी कॉंग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस समोरासमोर लढू शकतात. काही ठिकाणी राष्ट्रवादी-शिवसेनामध्ये लढत होईल. ज्याठिकाणी दोन पक्षाची, तीन पक्षाची आघाडी करायची गरज असेल किंवा स्वबळावर लढण्याची गरज असेल ती परिस्थिती बघून निर्णय घेतला जाणार असल्याचे मलिकांनी स्पष्ट केले आहे.

बातम्या आणखी आहेत...