आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

टीकास्त्र:उद्या निवडणूक झाली तर मोदी सरकार 400 जागा जिंकेल, चंद्रकांत पाटलांचा दावा; राऊत म्हणतात - 'एवढंच काय, मोदी सरकार जगभरातील संसदेच्या सर्व जागा जिंकू शकते'

मुंबई4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • पंतप्रधान नरेंद्र मोदींवर काँग्रेसकडून सातत्याने टीका केली जात आहे.

देशभरात कोरोनाने हाहाकार माजवलेला आहे. या काळात विरोधकांकडून केंद्र सरकारच्या कार्यपध्दतीवर टीका केली जात आहे. काँग्रेस नेते राहुल गांधी आणि सोनिया गांधीही सातत्याने मोदी सरकारवर टीका करत आहे. यावर भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटलांनी भाष्य केले. पंतप्रधान मोदींना बदनाम करण्याचे काँग्रेसचे षडयंत्र असल्याचा आरोप पाटलांनी केला. तसेच देशात उद्या निवडणूक झाली तर मोदी सरकार 400 पेक्षा जास्त जागा जिंकेल असा दावा त्यांनी केला होता. आता यावर राऊतांनी भाष्य केले आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदींवर काँग्रेसकडून सातत्याने टीका केली जात आहे. यावर भाष्य करताना भाजपचे प्रदेशाध्यक्ष म्हणाले की, पंतप्रधान मोदींना बदनाम करण्याचे काँग्रेसचे षडयंत्र आहे. टूलकिट आणि राहुल गांधींकडून केल्या जाणाऱ्या टीकेवर बोलताना त्यांनी हा आरोप केला आहे. पुढे बोलताना ते म्हणाले की, देशात अगदी उद्या जरी निवडणूक झाली, तरी मोदी सरकार 400 जागा जिंकेल असा दावा त्यांनी केला. यावर राऊतांनी भाष्य करत चंद्रकांत पाटलांना खोचक टोला लगावला आहे.

राऊत प्रसार माध्यमांशी बोलताना म्हणाले की, 'चंद्रकांत पाटीलांनी भविष्य सांगण्याचा नवा व्यवसाय सुरू केला आहे, याचे मला कौतुक वाटतेय. त्यामुळे भाजप 400 काय अगदी 500 जागाही मिळवू शकते. एवढेच नाही तर जगभरातील संसदेच्या सर्व जागा जिंकू शकतात. मात्र सध्या राजकीय भविष्य वर्तवण्यापेक्षा कोरोना काळामध्ये लोकांचे भविष्य घडवणे जास्त महत्त्वाचे आहे असे संजय राऊत म्हणाले.

बातम्या आणखी आहेत...