आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराराज्यात कोरोनाने थैमान घातले आहे. देशभरातील सर्वात जास्त रुग्ण हे महाराष्ट्रात सापडत आहेत. दरम्यान आता राज्यावर अजुन एक संकट आले आहे. राज्यामधील विविध लसीकरण केंद्रांवर लसींचा तुटवडा भासत आहे. जर महाराष्ट्रात योग्य वेळी लसींचा पुरवठा झाला नाही तर येत्या तीन दिवसात राज्यातील लसींचा साठा हा संपण्याची भीती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी व्यक्त केली आहे.
मंगळवारी केंद्रीय आरोग्यमंत्री हर्षवर्धन यांची 11 राज्यांच्या आरोग्यमंत्र्यांसोबत बैठक पार पडली. व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून ही बैठक घेण्यात आली. बैठकीमध्ये राजेश टोपेंनी लसीकरण, ऑक्सिजन यासोबतच रेमडेसिवीरच्या वापरासंबंधी काही महत्वाच्या सूचना केलेल्या आहेत. पत्रकार परिषदेत त्यांनी याविषयी माहिती दिली आहे. ते म्हणाले की, 'सध्या महाराष्ट्रात 14 लाख कोरोनावरील लसीचा पुरवठा आहे. हा पुरवठा 3 दिवसांपर्यंतच पुरेल. यामुळे आम्ही केंद्राकडे प्रत्येक आठवड्याला 40 लाख करोना लसीचे डोस पुरवण्याची मागणी केली आहे'
केंद्राने पुरवठ्याचा वेग वाढवावा
केंद्राकडून येणाऱ्या लसींविषयी राजेश टोपे म्हणाले की, 'लसीकरण केंद्रावर पुरेसे लसीचे डोस उपलब्ध नाहीत. यामुळे अनेकांना पुन्हा परत पाठवले जात आहे. केंद्र सरकार लसीचा पुरवठा करत नाही असे मी म्हणणार नाही. मात्र लस पाठवण्याचा वेग हा कमी आहे. हा वेग आणखी वाढवता येईल. यासोबतच, 20 ते 40 वयोगटातील जनतेला प्रधान्याने लसीकरणाची परवानगी द्यावी' अशी मागणीही आरोग्य मंत्र्यांनी केंद्राकडे केली आहे.
लसीकरणात महाराष्ट्र पहिल्या नंबरवर
कोरोना रुग्णांची संख्या राज्यात सर्वाधिक आहे. यासोबतच लसीकरणामध्येही महाराष्ट्र राज्य हे पहिल्या क्रमांकाचे राज्य आहे. यावर टोपे म्हणाले की, ' लसीकणामध्ये महाराष्ट्र पहिल्या क्रमांकावर आहे. जर एखादा रामबाण उपाय असेल तर आपल्यामध्ये प्रतिकारश्की निर्माण करणे आवश्यक आहे. यासाठी लसीकरण करुन घेणे महत्वाचा मार्ग आहे. लसीकरण मोफत आणि सुरक्षित आहे. मात्र लस मिळत नाही हा मोठा प्रश्न आहे. त्यामुळे मी पोटतिकडीने विनंती केली आहे.'
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.