आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अफवांवर पडदा:जयंत पाटील म्हणाले अफवांवर विश्वास ठेवू नका, माझी प्रकृती उत्तम; हृदयविकाराच्या झटक्यानंतर रुग्णालयात दाखल झाल्याचे होते वृत्त

मुंबई2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • जयंत पाटलांनी ट्विट करत दिली प्रकृतीची माहिती

राज्याचे जलसंपदा मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांना बुधवारी सायंकाळी मुंबईच्या ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यांना हृदयविकाराचा झटका आल्यानंतर रुग्णालयात दाखल करण्यात आले असे वृत्त सुरुवातीला होते. मात्र आता जयंत पाटलांनी हे वृत्त फेटाळून लावत आपण नियमित तपासणीसाठी रुग्णालयात दाखल झालो असल्याचे म्हटले आहे.

हार्टअटॅक आल्याचे होते वृत्त
जलसंपदा मंत्री आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांना बुधवारी सायंकाळी हृदयविकाराच्या झटक्यानंतर मुंबईच्या ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आले असे वृत्त सुरुवातीला होते. पाटील यांनी बुधवारी मंत्रिमंडळाच्या बैठकीला हजेरी होती, दरम्यान त्यांना अस्वस्थ वाटले आणि बैठक अर्धवट सोडून ते रुग्णालयात दाखल झाले अशा चर्चा सुरुवातीला होत्या. मात्र जयंत पाटलांनी या चर्चांना फेटाळून लावल्या आहेत.

जयंत पाटलांनी ट्विट करत दिली प्रकृतीची माहिती
जयंत पाटलांनी ट्विट करत प्रकृती उत्तम असल्याची माहिती दिली आहे. ते म्हणाले की, 'आपल्या सर्वांच्या आशीर्वादाने माझी प्रकृती अत्यंत उत्तम आहे. काळजी करण्याचे कारण नाही. नियमित तपासणीसाठी मी रुग्णालयात गेलो होतो. डॉक्टरांनी मला विश्रांती घेण्याची सुचना केली आहे. कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नका. मी लवकर पुन्हा आपल्या सेवेत रुजू होईल. धन्यवाद!'

जयंत पाटील दोन दिवसांपूर्वी पूरग्रस्त पश्चिम महाराष्ट्र दौर्‍यावर आले होते. जयंत पाटील यांनी कोल्हापूरच्या सांगलीतील परिस्थितीची पाहणी केली होती. त्यांच्या दौऱ्यात ते अजित पवारांसोबत होते. त्यानंतर त्यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन पुरात झालेल्या नुकसानीची माहिती दिली. पाटील हे सांगलीचे पालकमंत्रीही आहेत. सोमवारी पाटील यांनी अधिकाऱ्यांना संकट परिस्थितीत सर्वतोपरी मदत करण्याचे निर्देश दिले होते. कृष्णा नदीच्या पाण्याच्या पातळीत मोठ्या प्रमाणात वाढ झाल्यामुळे तिचे पाणी काठावर आणि सांगली शहरालगतच्या गावात पोहोचले होते.

बातम्या आणखी आहेत...