आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राज्यातील 1,166 ग्रामपंचायतींसाठी 13 ऑक्टोबरला मतदान:14 ला मतमोजणी, जाणून घ्या ग्रामपंचायतींची जिल्हानिहाय संख्या

मुंबईएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

राज्यातील 1166 ग्रामपंचायतींच्या सदस्यपदांसह थेट सरपंचपदाच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी 13 ऑक्टोबर रोजी मतदान होणार आहे. त्यामुळे दसऱ्यानंतर दिवाळीपूर्वी ऐन सणांच्या धामधुमीत राज्यात निवडणुकांचा धुराळा उडणार आहे.

त्यासाठी संबंधित ठिकाणी आजपासून आचारसंहिता लागू झाली आहे. विधानसभेत ग्रामपंचायत सरपंचाच्या थेट निवडणुकीचे प्रस्तावित विधेयक मंजूर केल्यानंतर, राज्य निवडणूक आयोगाने बुधवारी राज्यातील 1,166 ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणूका जाहीर केल्या आहेत. त्यामुळे या निवडणुकीत थेट जनतेतून सरपंच निवडले जाणार आहे. सर्वोच्च न्यायालयाने नुकत्याच दिलेल्या आदेशानुसार, इतर मागासवर्गीयांसाठी (ओबीसी) राखीव असलेल्या जागांवर या निवडणुका होतील.

28 सप्टेंबरला छाननी

इच्छूकांना आपला उमेदवारी अर्ज 21 ते 27 सप्टेंबर या कालावधी दरम्यान दाखल करण्यात येतील. तर त्याची छाननी ही 28 सप्टेंबरला होईल. अर्ज मागे घेण्याची अंतिम मुदत 30 सप्टेंबर रोजी दुपारी 3 पर्यंत असेल. मतमोजणी 14 ऑक्टोबर रोजी होईल, असे राज्य निवडणूक आयुक्त यू. पी. एस. मदान यांनी सांगितले. त्यामुळे आता राज्यातील शिंदे-फडणवीस सरकार जास्तीत ग्रामपंचायतींच्या जागा जिंकण्यासाठी प्रयत्न करतील.

ग्रामपंचायतींची जिल्हा व तालुकानिहाय संख्या

ठाणे : कल्याण 7, अंबरनाथ 1, ठाणे 5, भिवंडी 31, मुरबाड 35 व शहापूर 79

पालघर : डहाणू 62, विक्रमगड 36, जवाहार 47, वसई 11, मोखाडा 22, पालघर 83, तलासरी 11, वाडा 70

रायगड : अलिबाग 3, कर्जत 2, खालापूर 4, पनवेल 1, पेण 1, पोलादपूर 4, महाड 1, माणगाव 3, श्रीवर्धन 1

रत्नागिरी : मंडणगड 2, दापोली 4, खेड 7, चिपळूण 1, गुहागर 5, संगमेश्वर 3, रत्नागिरी 4, लांजा 15, राजापूर 10

सिंधुदुर्ग : दोडामार्ग 2, देवडगड 2

नाशिक : इगतपुरी 5, सुरगाणा 61, त्र्यंबकेश्वर 57, पेठ 71

नंदुरबार : अक्कलकुवा 45, अक्राणी 25, तळोदा 55, नवापूर 81

पुणे : मुळशी 1, मावळ 1

सातारा : जावळी 5, पाटण 5 व महाबळेश्वर 6

कोल्हापूर : भुदरगड 1, राधानगरी 1, आजरा 1, चंदगड 1

अमरावती : चिखलदरा 1

वाशिम : वाशिम 1

नागपूर : रामटेक 3, भिवापूर 6, कुही 8

वर्धा : वर्धा 2, आर्वी 7

चंद्रपूर : भद्रावती 2, चिमूर 4, मूल 3, जिवती 29, कोरपना 25, राजुरा 30 ब्रह्मपुरी 1

भंडारा : तुमसर 1, भंडारा 16, पवनी 2, साकोली 1

गोंदिया : देवरी 1, गोरेगाव 1, गोंदिया 1, सडक अर्जुनी 1, अर्जुनी मोरगाव 2

गडचिरोली : चामोर्शी 2, अहेरी 2, धानोरा 6, भामरागड 4, देसाईगंज 2, आरमोरी 2, एटापल्ली 2, गडचिरोली 1

जास्तीत जास्त जागा जिंकणार

निवडणूक आयोगाने ग्रामपंचायत निवडणुकाच्या तारखा जाहीर केल्याने आता शिंदे-फडणवीस सरकार तसेच शिवसेनेसह काँग्रेस, राष्ट्रवादी जास्तीत जास्त जागा जिंकण्यासाठी प्रयत्न करतील. कारण राज्यात सत्तांतर झाल्यानंतर शिंदे-फडणवीस सरकारने ग्रामपंचायत निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यात चांगलेच वर्चस्व गाजवत अनेक ग्रामपंचायतींवर ताबा मिळवला.

बातम्या आणखी आहेत...