आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पावसाचा मुक्काम वाढणार:आज 8 जिल्ह्यांना मुसळधार पावसाचा इशारा; 22 ऑक्टोबरपर्यंत राज्यावर अस्मानी संकट राहण्याचा इशारा

मुंबई2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • राज्यात पुढील पाच ते सहा दिवस काही ठिकाणी जोरदार पाऊस पडण्याची शक्यता

परतीच्या पावसाने राज्याला झोडपून काढले आहे. या पावसामुळे अनेक जिल्ह्यांत शेतीचे मोठे नुकसान झाले. सध्या पाऊस थांबला असला तरी पुढील दोन दिवसांपर्यंत पाऊस कायम राहणार असल्याचा इशारा हवामान विभागाकडून देण्यात आला आहे. राज्यात पुढील पाच ते सहा दिवस काही ठिकाणी जोरदार पाऊस पडेल. कोकण, मध्य महाराष्ट्र व मराठवाड्यात सोमवारी तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह पावसाचा अंदाज हवामान खात्याच्या सूत्रांनी वर्तवला.

हवामान विभागानुसार, नाशिक, अहमदनगर, पुणे, कोल्हापूर, सातारा, सांगली, सोलापूर, उस्मानाबाद येथे आज मुसळधार पावसाची शक्यता आहे. दरम्यान पुण्यासह राज्यातील अनेक भागांत पुढील चार दिवस ढगांच्या गडगडाटासह पाऊस पडेल असा इशारा देण्यात आला आहे. घाटमाथ्याच्या परिसरात तुरळक ठिकाणी 51 ते 75 टक्के मुसळधार पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.

बातम्या आणखी आहेत...