आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

उन्हाळ्यात पावसाळा:राज्यात पुन्हा वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा, 7 ते 9 एप्रिल दरम्यान हवामान विभागाचा अलर्ट

मुंबई2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

गेल्या काही दिवसांपासून वातावरणात सतत चढउतार होत असताना राज्यात पुन्हा वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. हवामान विभागाने राज्यात 7,8 आणि 9 एप्रील रोजी अवकाळी पाऊस होण्याचा अंदाज वर्तवला आहे.

शेतकऱ्यांनो काळजी घ्या

मराठवाडा, विदर्भातील अनेक शेतकऱ्यांच्या रब्बी पिकांची अजून काढणी बाकी आहे. तर अनेक शेतकऱ्यांची हळद, मका, कांदा आदी पिकांची काढणी सुरू आहे. शेतकऱ्यांनी 5 एप्रीलच्या आधी सर्व पिकांची काढणी करून घ्यावी असे आवाहन हवामान खात्याकडून करण्यात आले आहे.

कोणत्या जिल्ह्यांमध्ये पाऊस?

राज्यामध्ये अहमदनगर, लातूर, धाराशीव, नांदेड, संभाजीनगर, परभणी, जळगाव, बुलढाणा, जालना, अकोला, अमरावती, वर्धा नागपूर या जिल्ह्यांना पावसाचा अलर्ट देण्यात आला आहे. या जिल्ह्यांमध्ये 7 ते 9 एप्रीलदरम्यान वादळी पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. त्यामुळे या जिल्ह्यांमधील नागरिकांनी आवश्यक काळजी घेण्याचे आवाहन हवामान खात्याकडून करण्यात आले आहे.

अवकाळीचा फटका

राज्यामध्ये मार्चमध्ये झालेल्या अवकाळी पावसाने आधीच हैराण झालेला शेतकरी पुन्हा एकदा संकटात सापडला आहे. हातातोंडाशी आलेल्या पीकांची नासाडी झाल्यानंतर पुन्हा एकदा वातावरणातील बदलांमुळे शेतकऱ्यांवर अवकाळी पावसामुळे आव्हान निर्माण झाले आहे.