आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराराज्यात गेल्या दोन ते तीन दिवसांपासून थंडीचा कडाका वाढला आहे. वातावरणात सातत्याने बदल होत आहेत. नवीन वर्षात कुठे थंडीचा कडाका तर कुठे ढगाळ वातावरण जाणवत आहे. राज्यातील बहुतांश भागांमध्ये तापमान चांगलेच कमी झालेले पाहायला मिळत आहे. रस्त्यांवर धुक्याची चादर पसरली असून दुपारी 12 वाजेपर्यंतही सूर्यदर्शन दुर्लभ झाले आहे.
पश्चिमी चक्रवातामुळे राज्यात येत्या काही दिवसात थंडीत वाढ होणार आहे. अफगाणिस्तानात पुन्हा दोन चक्रवात येण्याची शक्यता आहे. त्यामुळे उत्तर भारतात हिमवृष्टीसह पावसाची शक्यता असल्याने राज्यातही त्याचा परिणाम जाणवणार आहे. त्यामुळे येत्या काही दिवसांत थंडीत वाढ होणार आहे. थंडीचा पारा पुढील काही दिवसांत घसरण्याची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे.
पिकांवर बुरशीजन्य रोग
तापमानात घट होत असल्याने रब्बी हंगामातील गहू, हरभरा या पिकांना फायदा होणार आहे. मात्र, तापमानाच्या पारा आणखीन घसरल्याने रब्बी हंगामातील पिकांवर बुरशीजन्य रोग येण्याच्या अंदाज देखील कृषी विज्ञान केंद्राकडून वर्तवण्यात आला आहे.
या जिल्ह्यांमध्ये घसरला पारा
राज्यात धुळे, जळगाव, नाशिक, सातारा, कोल्हापूर, सांगली या जिल्ह्याच्या ग्रामीण आणि शहरी भागांमध्ये तापमान कमी झाले आहे. मुंबई आणि पुण्यातही पारा घसरला आहे. मुंबईत 15 ते 20 अंशांच्या आसपास पारा घसरला असून वातावरणात धुळीचे कण वाढल्याने एअर क्वालिटी बिघडली होती. उत्तर, मध्य आणि पश्चिम महाराष्ट्रातही मोठ्या प्रमाणावर थंडी पडली असून पुढचे काही दिवस अशीच परिस्थिती राहण्याचा अंदाज हवामान विभागाकडून वर्तवण्यात आला आहे.
औरंगाबादेत विमान उतरलेच नाही
कडाक्याच्या थंडीमुळे पडलेल्या धुक्यांमुळे औरंगाबाद शहरात उतरणाऱ्या विमानांना आपले लँडिंग रद्द करावे लागले. तर अनेक रेल्वेगाड्या विलंबाने धावत असल्याने रेल्वेचे वेळापत्रकही विस्कटले आहे. विलंबाने धावणाऱ्या रेल्वेगाड्यांमुळे प्रवाशांची मोठी गर्दी रेल्वे स्थानक आणि परिसरात आहे.
प्रमुख शहरांचे तापमान
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.