आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिव्य मराठी एक्सक्लुझिव्ह:महाराष्ट्राचे पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे म्हणाले - कोकणात मान्सून पर्यटन आणि मुंबईत रात्रीचे पर्यटन सुरु केले जाईल

मुंबई4 महिन्यांपूर्वीलेखक: विनोद यादव
  • कॉपी लिंक
  • पर्यटनाच्या माध्यमातून काय नवीन करण्याचा प्रयत्न करत आहात का?

राज्यात कोरोनामुळे कोलमडलेल्या अर्थव्यवस्थेला पर्यटनाच्या माध्यमातून बळ दिले जात आहे. राज्याचे पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांनी दैनिक दिव्य मराठीशी बोलताना ही माहिती दिली. दरम्यान, आदित्य ठाकरे यांनी राज्यातील महिलांवरील वाढते अत्याचार, मुंबईतील विषारी हवेमुळे परदेशी पर्यटकांवर होणारे परिणाम यावर ही मोकळेपणाने भाष्य केले. राज्यात लवकरच कोकणात मान्सून पर्यटन आणि मुंबईत रात्रीचे पर्यटन सुरु केली जाणार असल्याची माहिती आदित्य ठाकरे यांनी यावेळी दिली.

प्रश्न : कोरोना महामारीमुळे बिघडलेल्या महाराष्ट्राची अर्थव्यवस्था तुम्ही कशी सुधारणार?
उत्तर :
यूके, न्यूझीलंड, ऑस्ट्रेलिया, दक्षिण आफ्रिका यासारख्या देशांना पर्यटन क्षेत्रातून मोठ्या प्रमाणात महसूल मिळतो. कोरोना महामारीचा प्रभाव केवळ महाराष्ट्रावरचं नाहीतर संपूर्ण देश आणि जगावर झाले आहे. राज्यासह देशातील अर्थव्यवस्था पुन्हा रुळावर आणण्यासाठी विविध प्रयत्न सुरू आहेत. दरम्यान, रोजगाराला चालना देण्यासाठी आणि महसूल निर्माण करण्यासाठी पर्यटनाद्वारे प्रयत्न केले जात आहेत. परंतु, कोरोना महामारी पूर्णपणे कधी संपेल याची खात्री नसल्याने अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे.

प्रश्न : पर्यटनाच्या माध्यमातून काय नवीन करण्याचा प्रयत्न करत आहात का?
उत्तर :
पाहा, सर्वप्रथम 9 ऑक्टोबर रोजी कोकणातील सिंधुदुर्ग जिल्ह्यात चिपी विमानतळाचे उद्घाटन होणार आहे, जे गेम चेंजर म्हणून सिद्ध होणार आहे. यानंतर राज्यात अध्यात्म, नैसर्गिक वारसा, वन्यजीव आणि समुद्रकिनाऱ्यावरील पर्यटनाला अधिक प्रोत्साहन दिले जाईल. ज्यामुळे देशांतर्गत, आंतरराष्ट्रीय आणि आंतरराज्यीय पर्यटन वाढेल. यामाध्यमातून मोठ्या प्रमाणात महसूलही निर्माण होईल. कोरोनामुळे अर्थव्यवस्थेला पुन्हा रुळावर आणण्याची क्षमता पर्यटनामध्ये आहे. परदेशी पर्यटकांसाठी जागतिक धोरण तयार करण्याची गरज आहे, असे माझे मत आहे.

प्रश्न : WHO च्या नवीन मार्गदर्शक तत्त्वापेक्षा 8 पट अधिक पीएम 2.5 मुंबईच्या हवेत आहे. अशा विषारी हवेत पर्यटक इथे का येतील?
उत्तर :
एकट्या मुंबईच्या हवेतच पीएम 2.5 आहे असे नाही. इतर शहरांमध्ये आणि देशांमध्ये देखील पीएम तेवढ्याच आणि त्यापेक्षा जास्त आहे. या कारणामुळे महाराष्ट्र सरकार हळूहळू सार्वजनिक वाहनांमध्ये इलेक्ट्रिक वाहनांना प्रोत्साहन देत आहे. बेस्ट ट्रान्सपोर्टच्या ताफ्यात 386 बसेस इलेक्ट्रिक झाल्या आहेत. आणखी 19 बसेससाठी निविदा प्रक्रिया सुरू आहे. तर येत्या काळात 200 डबल डेकर इलेक्ट्रिक बस येतील. यामुळे हवेतील पीएम काही प्रमाणात कमी होण्यास मदत होईल.

प्रश्न : कोकणात पावसाळी पर्यटनाची आणि मुंबईत रात्रीच्या पर्यटनाची योजना होती, ती योजना कोल्ड स्टोरेजमध्ये गेली आहे का?
उत्तर
: सध्या सरकारचे संपूर्ण लक्ष आरोग्य आणि कायदा आणि सुव्यवस्था बळकट करण्यावर आहे. परंतु, कोकणात पावसाळी पर्यटन सुरू करण्याची योजना देखील खरी आहे. कारण कोकणातील रायगड, रत्नागिरी आणि सिंधूदुर्गचे सौंदर्य आश्चर्यकारक आहे. तेथे चिपी विमानतळाचे सुरु असून पीपीपी मॉडेलवर सात तारांकित हॉटेल उघडण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. राज्यातील कोरोना महामारीचा प्रार्दुभाव संपल्यानंतरच मुंबईत रात्रीचे पर्यटन पुन्हा लागू केले जाईल.

प्रश्न : मुंबईत महिला सुरक्षित नाहीत. त्यांच्यावरील अत्याचार वाढत आहेत. मग पर्यटक विशेषतः महिला मुंबई किंवा महाराष्ट्रात का येतील?
उत्तर :
परदेशी पर्यटकांसाठी महाराष्ट्राचे धोरण पूर्णपणे स्पष्ट आहे. भारत सरकारने मंजूर केलेल्या कोविड लसीचे दोन्ही डोस घेणारे पर्यटक मुंबईत येऊ शकतात. राज्य सरकारही महिलांच्या सुरक्षेबाबत खूप गंभीर आहे. एनसीआरबीचा अहवालानुसार, मुंबईतील महिलांवरील गुन्ह्यांच्या घटनांमध्ये 30 टक्क्यांनी घट झाली आहे.

बातम्या आणखी आहेत...