आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

PHOTOS मध्ये महाराष्ट्राचा प्रजासत्ताक दिन:अडीच महिन्यांनंतर सार्वजनिक कार्यक्रमात दिसले मुख्यमंत्री उद्धव ठाकरे; बीड आणि साताऱ्यात झाला आत्मदहनाचा प्रयत्न

मुंबई4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
महाराष्ट्रातील बीड येथे सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांच्यासमोर एका व्यक्तीने (डावीकडे) आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला आणि एका तरुणीने (उजवीकडे) सातारा जिल्हा दंडाधिकारी कार्यालयात पेट्रोल शिंपडून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. - Divya Marathi
महाराष्ट्रातील बीड येथे सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांच्यासमोर एका व्यक्तीने (डावीकडे) आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला आणि एका तरुणीने (उजवीकडे) सातारा जिल्हा दंडाधिकारी कार्यालयात पेट्रोल शिंपडून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला.

महाराष्ट्रासह देशभरात 73 वा प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा करण्यात आला. राज्यातील जवळपास सर्वच शहरांमध्ये शांततेत तिरंगा फडकवण्यात आला. एकीकडे शस्त्रक्रियेनंतर सुमारे अडीच महिन्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे पहिल्यांदाच मुंबईत सार्वजनिक कार्यक्रमात दिसले, तर दुसरीकडे पुण्यात उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते ध्वजारोहण झाले. आरएसएसच्या नागपूर येथील मुख्यालयातही ध्वजारोहण करण्यात आले. मात्र, कोविड साथीचा उद्रेक लक्षात घेता यावेळी संघ मुख्यालयात बाहेरून आलेल्या लोकांना प्रवेश नव्हता.

प्रजासत्ताक दिनानिमित्त काही नकारात्मक घटनाही पाहायला मिळाले. बीड जिल्ह्यात सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांच्यासमोर एका व्यक्तीने आत्मदहनाचा प्रयत्न केला. त्याचवेळी सातारा जिल्ह्यातही एका तरुणीने जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर पेट्रोल अंगावर ओतून आत्महत्येचा प्रयत्न केला आहे. दोन्ही ठिकाणी प्रजासत्ताक दिनाच्या कार्यक्रमादरम्यान हा प्रकार घडला.

मात्र, घटनास्थळी उपस्थित सुरक्षा कर्मचाऱ्यांनी योग्य वेळी आत्मदहन करणाऱ्यांना पकडले आणि मोठी दुर्घटना टळली.

महाराष्ट्रात प्रजासत्ताक दिन कसा साजरा झाला पाहा फोटोंमध्ये..

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते वर्षा निवासस्थानी ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी मुख्यमंत्र्यांच्या पत्नी रश्मी ठाकरे, पर्यटन-पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे, मुख्य सचिव देबाशीष चक्रवर्ती आणि मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव विकास खारगे उपस्थित होते.

प्रजासत्ताक दिनानिमित्त राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी शिवाजी पार्कवर आयोजित मुख्य कार्यक्रमाला उपस्थित राहून जनतेला संबोधित केले.
प्रजासत्ताक दिनानिमित्त राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी शिवाजी पार्कवर आयोजित मुख्य कार्यक्रमाला उपस्थित राहून जनतेला संबोधित केले.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर 12 नोव्हेंबरला मणक्याची शस्त्रक्रिया झाली. त्यानंतर प्रथमच त्यांनी सार्वजनिक कार्यक्रमांना हजेरी लावली. या कार्यक्रमात राज्यपाल भगतसिंग कोश्यारीही उपस्थित होते.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर 12 नोव्हेंबरला मणक्याची शस्त्रक्रिया झाली. त्यानंतर प्रथमच त्यांनी सार्वजनिक कार्यक्रमांना हजेरी लावली. या कार्यक्रमात राज्यपाल भगतसिंग कोश्यारीही उपस्थित होते.
या कार्यक्रमात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे पूर्णपणे फिट दिसले.
या कार्यक्रमात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे पूर्णपणे फिट दिसले.
पुण्यातील शिवाजीनगर येथील पोलिस मुख्यालयात उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.
पुण्यातील शिवाजीनगर येथील पोलिस मुख्यालयात उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.
आरएसएसचे महानगर संघचालक राजेश लोया यांनी नागपुरातील आरएसएसच्या मुख्यालयात राष्ट्रध्वज फडकावला
आरएसएसचे महानगर संघचालक राजेश लोया यांनी नागपुरातील आरएसएसच्या मुख्यालयात राष्ट्रध्वज फडकावला
मुंबईतील शिवाजी पार्कच्या मुख्य सोहळ्यातील पोलिस दल
मुंबईतील शिवाजी पार्कच्या मुख्य सोहळ्यातील पोलिस दल
प्रजासत्ताक दिनाच्या सोहळ्यात मुले हातात तिरंगा घेऊन आनंद व्यक्त करताना
प्रजासत्ताक दिनाच्या सोहळ्यात मुले हातात तिरंगा घेऊन आनंद व्यक्त करताना
प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने असेही नजारे पाहायला मिळाले.
प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने असेही नजारे पाहायला मिळाले.
प्रजासत्ताक दिनानिमित्त मुंबईत विंटेज कार रॅलीचे आयोजन करण्यात आले होते.
प्रजासत्ताक दिनानिमित्त मुंबईत विंटेज कार रॅलीचे आयोजन करण्यात आले होते.
मुंबईतील 73 व्या प्रजासत्ताक दिनाच्या सोहळ्यात सामील झालेले मुले.
मुंबईतील 73 व्या प्रजासत्ताक दिनाच्या सोहळ्यात सामील झालेले मुले.
बातम्या आणखी आहेत...