आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिलासा:एक जूनपासून काही जिल्ह्यांना दिलासा; लॉकडाऊनमध्ये अंशत: शिथिलता देणार

मुंबई2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • राज्यातील १४ जिल्ह्यांना रेड झोन म्हणून घोषित करण्यात आले आहे.

राज्यात कोरोना रुग्णसंख्येमध्ये घट होत असल्याने आता १ जूननंतर लॉकडाऊन शिथिल करणार असल्याची माहिती राज्याचे मदत व पुनर्वसनमंत्री विजय वडेट्टीवार यांनी सोमवारी दिली. इतकेच नाहीतर राज्यात रेड झोन असलेल्या १४ जिल्ह्यांना वगळता इतर ठिकाणी नियम शिथिल करण्यात येणार आहेत, असे त्यांनी स्पष्ट केले. राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होत असल्याची माहिती समोर आल्यानंतर आता १ जूननंतर लॉकडाऊन हटवणार का ? असा प्रश्न वारंवार विचारला जात आहे. यावर विजय वडेट्टीवार यांनी आज महत्त्वाचे संकेत दिले. राज्यातील १४ जिल्ह्यांना रेड झोन म्हणून घोषित करण्यात आले आहे.

या जिल्ह्यांमध्ये कडकडीत लॉकडाऊन असला तरी कोरोनाच्या रुग्णांमध्ये घट होताना दिसत नाही. त्यामुळे हे १४ जिल्हे वगळता इतर जिल्ह्यांमध्ये १ जूननंतर लॉकडाऊन शिथिल करण्यात येईल. दरम्यान, या वेळी वडेट्टीवार यांनी मुंबई लोकलसंबंधीही महत्त्वाची माहिती दिली आहे. अत्यावश्यक सेवा देणाऱ्यांसाठी सध्या लोकल सुरू असून अजून पुढचे १५ दिवस तरी सामान्य नागरिकांना लोकलने प्रवास करता येणार नसल्याचे ते म्हणाले.दरम्यान, गेल्या दीड महिन्यांपासून राज्यात लॉकडाऊन सुरू असल्याने अनेकांचे कर्जाचे हप्ते थकले आहेत. अशा लोकांना राज्य सरकारने मदत देण्याची मागणीही मोठ्या प्रमाणात होत आहे.

बातम्या आणखी आहेत...