आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Local
  • Maharashtra
  • Mumbai
  • Maharastra Corona Virus Updates: Strict Lockdown In Four Districts Of The State From Today; New Double Strain Of Corona Found In Nagpur; News And Live Updates

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

महाराष्ट्रात कोरोनाचा कहर:आजपासून चार जिल्ह्यात तर बुधवारपासून एका जिल्ह्यात कडक लॉकडाऊन; नागपुरमध्ये आढळला कोरोनाचा नवा डबल स्ट्रेन

मुंबई9 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • सांगलीचे पालकमंत्री जयंत पाटील यांनी एका आठवड्यासाठी लॉकडाऊन घोषीत केला आहे

राज्यात कोरोना महामारीचा प्रादुर्भाव झपाट्याने वाढतच आहे. याच पार्श्वभूमीवर राज्यातील चार जिल्ह्यांमध्ये कडक लॉकडाऊनची घोषणा करण्यात आली आहे. यात सांगली, सातारा, बारामती आणि अहमदनगर जिल्ह्यांचा समावेश आहे. विशेष म्हणजे यात किराणा, फळे, भाजीपाला, बेकरी, डेयरी, मिठाई आणि खाद्यपदार्थांची दुकानेही येत्या 7 दिवसांसाठी बंद राहणार आहे. हा लॉकडाऊन आज (मंगळवार) सकाळी सात वाजेपासून सुरु होणार असून 10 मे च्या रात्री बारा वाजेपर्यंत लागू राहणार आहे. दरम्यान, आज कोल्हापूर येथे झालेल्या बैठकीत येत्या बुधवारपासून कोल्हापूरातदेखील कडक लॉकडाऊन जाहीर करण्यात आला आहे.

नागपुरमध्ये आढळले डबल म्यूटंट व्हायरस
राज्याची उपराजधानी नागपुर शहरात कोरोना व्हायरसचे डबल म्यूटंट आढळले आहे. दरम्यान, दिल्लीहून मिळलेल्या अवहालानुसार, 74 सॅम्पलमधील 35 सॅम्पलमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे 5 नवे स्ट्रेन आढळल्याचे समोर आले आहेत. तर इतर 26 सॅम्पलमध्ये डबल म्यूटेशन असल्याचे इंदिरा गांधी मेडिकल कॉलेजमधील मायक्रो बायोलॉजी विभागाचे सहयोगी प्राध्यापक डॉ. रवींद्र खडसे यांनी सांगितले. विशेष म्हणजे सर्दी, खोकला आणि ताप या स्ट्रेनचे नवीन लक्षण आहेत. हे सॅम्पल नागपूर येथील इंदिरा गांधी मेडिकल कॉलेज आणि नागपूर मेडिकल कॉलेजमध्ये आलेल्या संशयित रुग्णांचे असून एनआयव्ही पुणे आणि एनसीडीसी दिल्ली येथे तपासणी करीता पाठवण्यात आले होते.

सांगलीत एका आठवड्यासाठी लॉकडाऊन जाहीर
गेल्या चोवीस तासांत सांगली जिल्ह्यात 1 हजार 568 कोरोनाचे नवीन रुग्ण आढळून आले असून यामध्ये 40 लोकांचा मृत्यू झाला आहे. दरम्यान, राज्याचे जलसंसाधन मंत्री आणि सांगलीचे पालकमंत्री जयंत पाटील यांनी एका आठवड्यासाठी लॉकडाऊन घोषीत केला आहे. या संदर्भात त्यांनी आपल्या सोशल मीडिया हँडलवरुन एक व्हिडियो शेअर केला आहे.

कोल्हापूर जिल्ह्यात 10 दिवसांचा कडकडीत लॉकडाऊन
जिल्ह्यात वाढती रूग्णसंख्या पाहता उद्यापासून पुढील 10 दिवस कडकडीत लॉकडाऊन पाळण्याचा निर्णय आज सकाळी 10 वा. झालेल्या बैठकीत घेण्यात आला. यावेळी ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ, पालकमंत्री सतेज पाटील, आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर हे दूरदृश्यप्रणालीव्दारे बैठकीत सहभागी झाले होते.

जिल्ह्याचा कोरोनाचा वाढता प्रार्दुभाव लक्षात घेता हा निर्णय घेण्यात आला असल्याचे पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी सांगितले. त्यामुळे आता कोल्हापूर जिल्ह्यात उद्या बुधवार दि. 5 मे सकाळी 11 पासून जिल्ह्यात पुढील 10 दिवसांसाठी कडकडीत लॉकडाऊन असणार आहे. जिल्ह्यातील 2400 रूग्ण ऑक्सिजनवर आहेत असून यासाठी कोल्हापूर सांगली, सिंधुदुर्ग, निपाणी, बेळगाव भागातून ऑक्सिजनचा पुरवठा केला जातो.

बातम्या आणखी आहेत...