आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आरोग्यमंत्री हे मानसिक रोगी:युवक राष्ट्रवादी काँग्रेसची टीका, मुख्यमंत्र्यांनी तातडीने राजीनामा घेण्याची मागणी

8 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

आरोग्यमंत्री तानाजी सावंत हे मानसिक रोगी असून मुख्यमंत्र्यांनी त्यांचा तातडीने राजीनामा घ्यावा, अशी मागणी युवक राष्ट्रवादी काँग्रेसने केली आहे.

मराठा आरक्षणाबाबत केलेल्या वादग्रस्त वक्तव्यामुळे आरोग्यमंत्री तानाजी सावंत पुन्हा वादाच्या भोवऱ्यात सापडले आहेत. युवक राष्ट्रवादी काँग्रेसने मंत्री तानाजी सावंत यांच्या वक्तव्याचा जाहीर निषेध केला आहे.

मराठा समाजाचा अपमान

युवक राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्याध्यक्ष सुरज चव्हाण यांनी सांगितले की, आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांनी मराठा समाजाच्या आरक्षणाच्या मागणीला खाजेशी सोडून मराठा समाजाचा अपमान केला आहे. तानाजी सावंत यांना सत्ता आणि संपत्तीचा माज आला आला आहे. अशा मानसिक रोगी असलेल्या आरोग्यमंत्र्यांचा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तात्काळ राजीनामा घ्यावा. अन्यथा तानाजी सावंत यांना रस्त्यावर फिरणेही कठीण होईल.

काय म्हणाले होते तानाजी सावंत?

उस्मानाबादमध्ये जाहीर सभेत तानाजी सावंत म्हणाले होते, सत्तांतर होताच मराठा आरक्षणाच्या विषयाची खाज का? मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी शिंदे - फडणवीस सरकार कटिबद्ध आहे. मात्र, गेली 2 वर्षे हे सर्व जण शांत होते. आता म्हणतात ओबीसीमधून आरक्षण पाहिजे. उद्या म्हणतील एससीमधून पाहिजे. याचा सगळा करता करविता कोण हे सगळ्यांना चांगल माहीत आहे. पण, मराठा आरक्षणाचा विषय आत्ताच काढून वातावरण खराब करणाऱ्यांना ओळखलं पाहिजे.

मराठा क्रांती मोर्चा आक्रमक

तानाजी सावंत यांच्या या वक्त्यावरुन मराठा क्रांती मोर्चानेही आक्रमक भूमिका घेतली आहे. मंत्री तानाची सावंत यांनी मराठा समाजाची माफी मागावी. तसेच, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ही बाब हलक्यात घेऊ नये. तानाजी सावंत यांच्या वक्तव्याबाबत आपली भूमिका स्पष्ट करावी. अन्यथा महाराष्ट्रात एकाही मंत्र्याला फिरु देणार नाही, असा इशारा मराठा क्रांती मोर्चाने दिला आहे.