आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराकेंद्र सरकारने दोन दिवसांपूर्वी 21 राज्यांना 86 हजार 912 कोटी जीएसटी परतावा दिला. त्यात महाराष्ट्राच्या वाट्याला 14 हजार 145 कोटी राज्य सरकारच्या पदरी पडली. मात्र, अद्यापही केंद्रांकडून 15 हजार 502 कोटी रुपयांचा जीएसटी परतावा येणे बाकी आहे, अशी माहिती राज्याचे अर्थमंत्री अजित पवार यांनी दिली. ते आज मुंबईत आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते.
किती येणे बाकी?
केंद्राकडे बाकी असलेल्या रकमेत 2019-20 मधली 1029 कोटी रुपये, 2020-21 मधली 6470 कोटी रुपये येणे बाकी आहे आणि 2021-22 मधले 8003 कोटी रुपये येणे बाकी आहे. असे एकूण 15 हजार 502 कोटी रुपये केंद्राकडून राज्याला मिळणे बाकी आहे. 29 हजार 647 कोटींपैकी राज्याला सध्या 14 हजार 145 कोटी मिळाले आहेत, 15 हजार 502 कोटी येणे अपेक्षित आहे, अशी माहिती अजित पवारांनी दिली.
मास्क वापरणे गरजेचे
अजित पवार म्हणाले की, कोरोनाचे रुग्ण वाढत आहे. त्यावर काल मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंसोबत बैठक झाली. आता सर्वांनी काळजी घेणे महत्वाचे आहे. प्रत्येकाने आता मास्क वापरणे गरजेचे आहे. राज्य सरकार, आरोग्य विभाग, टास्क फोर्स आम्ही सर्वजण याकडे लक्ष घालत आहोत.
ओबीसी आरक्षणासाठी प्रयत्न
अजित पवार म्हणाले, ओबीसी आरक्षणासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत. निवडणुकीमध्ये त्यांना त्यांच्याप्रमाणामध्ये प्रतिनिधीत्व मिळायला पाहिजे. मध्यप्रदेशात ज्या प्रकारे ओबीसींना आरक्षण मिळाले. त्यासाठी राज्य सरकार प्रयत्न करत आहे.
मागणी करण्याचा अधिकार
अजित पवार म्हणाले, अनेक वर्षांपासून नामांतराच्या मागण्या आहेत. औरंगाबाद, उस्मानाबादचे नामकरण करा अशी मागणी आहे. लोकशाहीमध्ये प्रत्येकाला अशी मागणी करण्याचा अधिकार आहे. नामांतराप्रमाणे कुठले प्रश्न कुठले महत्वाचे आहेत याकडे आपण पाहिले पाहिजे,.
हा त्यांचा वैयक्तिक प्रश्न
गोपीचंद पडळकर यांनी अहमदनगर जिल्ह्याला पुण्यश्लोक अहिल्यादेवींची नाव देण्यात यावे या मागणीचे पत्र मुख्यमंत्र्यांकडे पाठवले. त्यावर बोलताना अजित पवार म्हणाले की, कुणी काय आरोप करावे, काय मागणी करावी हा त्यांचा वैयक्तिक प्रश्न आहे. पुण्यश्लोक अहिल्यादेवींच्या जयंतीला सर्वच जण जात राहतात.
3 तारखेला चित्र समजेल
अजित पवार म्हणाले की, भाजपचे दोन उमेदवार, काँग्रेस, शिवसेना, राष्ट्रवादीचा एक-एक उमेदवार त्यांच्या स्वत:च्या चिन्हावर निवडून येणार आहेत. सहाव्या जागेसाठी भाजप आणि शिवसेनेनेही उमेदवार उभा केला आहे. अंतिम चित्र 3 तारखेला 3 वाजता समजेत की, सहा उमेदवार राहता की सात उमेदवार राहता.
राष्ट्रवादीची मते शिवसेनालाच
अजित पवार म्हणाले, राजसभेच्या सहाव्या जागेसाठी राष्ट्रवादी शिवसेनेला पाठिंबा देणार आहे. राजकीय पक्षांच्या आमदारांबाबत घोडेबाजार होण्याची शक्यता नाही, शिवसेना आणि भाजपला प्रत्येकी 10-12 मतांची गरज आहे. छोटे पक्ष आणि अपक्ष आमदार महत्वाची भूमिका निभावणार आहेत.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.