आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

महात्मा गांधींच्या हत्येसाठी सावरकरांनी बंदूक पुरवली:महात्मा गांधींचे पणतू तुषार गांधी यांची वादात उडी

मुंबई11 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या सावरकरांवरील आरोपानंतर उठलेले वादळ शमत नाही तोच या वादात आता महात्मा गांधी यांचे पणतू तुषार गांधी यांनी उडी घेत “महात्मा गांधी यांना मारण्यासाठी नथुराम गोडसेला सावरकरांनी बंदूक पुरवली होती,’ असा आरोप करून खळबळ उडवून दिली आहे. गांधी यांनी हा आरोप ट्वीटच्या माध्यमातून केला आहे.

तुषार गांधी यांनी ट्वीटमध्ये म्हटले की, “सावरकर यांनी केवळ इंग्रजांनाच मदत केली नाही, तर बापूंना मारण्यासाठी नथुराम गोडसेला चांगली बंदूक मिळवून देण्यासाठी मदत केली. बापूंच्या हत्येच्या दोन दिवस आधीपर्यंत नथुराम गोडसेकडे कुठलेही शस्त्र नव्हते. १९३० मध्ये बापूंना मारण्याचे अनेक प्रयत्न झाले. प्रबोधनकार ठाकरे यांनी बापूंच्या साथीदारांना अकोला, विदर्भात बापूंच्या हत्येचा कट रचल्याची पूर्वसूचना दिली होती. त्यामुळे बापूंचे प्राण वाचले. त्यानंतर त्यांनी महाराष्ट्रातील सनातनी हिंदू संघटना आणि त्यांच्या नेतृत्वाला बापूंवर हल्ला न करण्याचा जाहीर इशारा दिला. सावरकर आणि हेडगेवार हे सनातनी हिंदूंचे नेते होते. म्हणून प्रबोधनकारांचा इशारा त्यांना उद्देशून होता. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी त्यांच्या या इतिहासाची आठवण करून दिली पाहिजे. सावरकरांनी केवळ इंग्रजांनाच मदत केली नाही, तर बापूंच्या हत्येसाठी नथुरामला एक सक्षम बंदूक शोधण्यातही मदत केली.

बातम्या आणखी आहेत...