आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिव्य मराठी एक्सक्लूझिव्हतुषार गांधींचे रणजित सावरकरांना प्रत्युत्तर:पहिला कट फसल्यानंतर सावरकरांनी गोडसेला पिस्तूल शोधून देण्यात मदत केली

विनोद यादव | मुंबई10 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

सावरकरांच्या माफीवरून सुरू झालेले आरोप-प्रत्यारोप आता गांधीजींच्या हत्येपर्यंत पोहोचले आहेत. महात्मा गांधींच्या हत्येचे धागेदोरे काँग्रेसपर्यंत पोहचतात, असा दावा स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे नातू रणजित सावरकर यांनी केला होता.

त्यावर पहिला कट फसल्यानंतर सावरकरांनी गोडसेला पिस्तूल शोधून देण्यात मदत केली, असे प्रत्युत्तर महात्मा गांधींचे पणतू तुषार गांधी यांनी दिले आहे. दिव्य मराठीचे प्रतिनिधी विनोद यादव यांनी तुषार गांधींशी संवाद साधला.

प्रश्न : महात्मा गांधीजींच्या हत्येसाठी सावरकरांनी गोडसेंना शस्त्र पुरवल्याचा तुमचा आराेप आहे. त्यावर रणजित सावरकर म्हणतात, ते शस्त्र काँग्रेसच्याच नेत्याने पुरवले. काय म्हणाल?

तुषार गांधी : सत्य हे रणजित यांच्या दाव्याच्या उलट आहे. पुरावे सांगतात की, २० जानेवारी १९४८ रोजी गांधी हत्येचा पहिला प्रयत्न करण्याचा कट होता. त्यासाठी गोडसे व नारायण आपटेने पुण्यातील शस्त्र विक्रेता बडगेशी संपर्क साधला. अनेक वर्षांपूर्वी पुणे काँग्रेसच्या एका कार्यकर्त्याकडून खरेदी केलेले पिस्तूल बडगेने गोडसेला विकले. चाचणीत हे पिस्तूल फेल झाले. पण हेदेखील खरे आहे की, ३० जानेवारी १९४८ रोजी ज्या पिस्तुलाने गांधीजींची हत्या झाली ते पिस्तूल ग्वाल्हेरचा सावरकर भक्त डॉ. परचुरेने गोडसेला दिले होते. ट्वीटमध्ये मी म्हटलेच आहे की, सावरकरांनी ब्रिटिशांना मदत तर केलीच, सोबत नथुरामला चांगले पिस्तूल शोधून देण्यातही साह्य केले. कपूर कमिशनच्या आधारे मी हा दावा करत आहे. त्या वेळी वापरलेल्या पिस्तुलाबाबत ग्वाल्हेरमधून २-३ पुरावे सापडले होते. या सर्व गोष्टी पुराव्यानिशी सिद्ध आहेत.

प्रश्न : इतिहासावर बोलताना महापुरुषांवर आरोप केले जातात आणि वाद होतात. हे कुठे तरी थांबायला हवे आणि यासाठी काय करावे लागेल असे तुम्हाला वाटते?

तुषार गांधी : जे आरोप खरे आहेत आणि ज्यात पुरावे आहेत, असे आरोप झालेच पाहिजेत. पण जर कुणी खोटे आरोप केले तर त्यांंना सडेतोड उत्तर देणे गरजेचे आहे. गेल्या ७५ वर्षांपासून हे लोक बापूंबद्दल घाणेरडा अपप्रचार करत आहेत. तेव्हा या लोकांना महापुरुषांचा आदर आठवत नाही. आता जेव्हा आपण खरे बोलतो तेव्हा त्यांना महापुरुषांचा आदर आठवतो?

प्रश्न : रणजित सावरकर म्हणतात की, काँग्रेस स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या सकारात्मक पैलूंवर चर्चा का करत नाही?

तुषार गांधी : याबाबत माझे पुस्तक वाचावे. सावरकरांच्या काळ्या पाण्याच्या शिक्षेपूर्वीची भूमिका आणि त्यानंतरचे सावरकर याबद्दल मी स्पष्ट लिहिले आहे. त्यांना प्रॉब्लेम आहे. गांधीजींचे मोठेपण मान्य करताना त्यांचे पोट दुखते.

रणजित सावरकरांचा खळबळजनक दावा:महात्मा गांधींच्या हत्येच्या हत्याराचे धागेदोरे थेट काँग्रेसपर्यंत; पु. ल. इनामदारांच्या पुस्तकाचा दिला दाखला

बातम्या आणखी आहेत...