आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

महात्मा फुले जन आरोग्य योजनेची मर्यादा 5 लाख:जाणून घ्या- यंदाच्या अर्थसंकल्पातील आरोग्यासंदर्भातील महत्त्वाच्या घोषणा

मुंबई23 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजनेत उपचाराची मर्यादा वार्षिक दीड लाखावरून 5 लाख रुपये करण्यात येत असल्याची घोषणा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत अर्थसंकल्प सादर करताना केली.

4 कोटी महिलांची मोफत आरोग्य तपासणी केली जाणार
महिलांच्या आरोग्यासाठी ‘माता सुरक्षित तर घर सुरक्षित’ या अभियानाअंतर्गत चार कोटी महिला व मुलींची आरोग्य तपासणी व औषधोपचार करण्यात येतील.

नवीन 700 'आपला दवाखाना' सुरू केले जाणार
आपला दवाखाना उपक्रम आपण सुरू केला त्याला प्रचंड प्रतिसाद लाभला, तो पाहता आता संपूर्ण राज्यामध्ये हिंदुहृदयसम्राट स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांच्या नावे 700 आपला दवाखाना सुरू करण्यात येतील, त्याद्वारे मोफत उपचार करण्यात येतील.

मुत्रपिंड शस्त्रक्रियाच्या दरात 4 लाखांची वाढ

मुत्रपिंड शस्त्रक्रियाच्या उपचार दरात अडीच लाखावरून 4 लाखांची वाढ करण्याची घोषणा अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली.

एका दृष्टीक्षेपात वाचा सविस्तर

अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मोठी घोषणा केली आहे. आरोग्य विभागासाठी 3 हजार 520 कोटी रूपयांची तरतुद करण्यात आली आहे. राज्यातील जनतेला गंभीर आजारांवरील उपचारांसाठी पुर्णपणे नि:शुल्क आरोग्य सुविधांचा लाभ विशेषज्ञ सेवांतर्गत पॅकेजेससाठी अंगीकृत रुग्णालयांमधून उपलब्ध करून देणे ही आहे. राज्यात सध्या महात्मा फुले जन आरोग्य योजना आणि प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेसह एकत्रितपणे राबवले जाते.

नवीन 200 रुग्णालय उभारली जाणार

महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजनेंतर्गत लाभार्थी कुटुंबाला प्रति कुटुंब प्रति वर्ष 1.50 लाख रुपये पर्यंत विमा संरक्षण मिळत होते. मात्र आता शिंदे-फडणवीस सरकारने यांची रक्कम वाढवून ती 5 लाख एवढी वाढवली आहे. तर मूत्रपिंड प्रत्यारोपणासाठी ही मर्यादा 4 लाख रुपयांपर्यंत वाढवली आहे. तर राज्यभरात नवीन 200 रुग्णालयांचा यात समावेश करणार आहे.

राज्यात 14 शासकीय वैद्यकीय महाविद्यालय बांधकाम करणार

  • राज्यात 14 ठिकाणी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांची बांधकामे केली जाणार आहे. सातारा, अलिबाग, सिंधुदुर्ग, धाराशिव, परभणी, अमरावती, भंडारा, जळगाव, रत्नागिरी, गडचिरोली, वर्धा, बुलढाणा, पालघर, अंबरनाथ (ठाणे) या ठिकाणी महाविद्यालयाच्या इमारतीचे बांधकाम केले जाईल.
  • मानसिक अस्वस्थता आणि व्यसनाधीनतेची वाढती समस्या पाहता जालना, भिवंडी, पुणे, नागपूर येथे नवीन व्यसनमुक्ती केंद्रे उभारली जाणार आहेत.

हे ही वाचा

MJPJAY योजना गरिबांसाठी वरदान:महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजनेचा कसा घ्यावा लाभ, काय आहे पात्रता? जाणून घ्या!

21 नोव्हेंबर 2013 रोजी या योजनेचा राज्यातील 28 जिल्ह्यांत विस्तार करण्यात आला. त्यानंतर या योजनेचे 'महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना' (MJPJAY) असे नामकरण करण्यात आले. सध्या या योजनेचा लाभ महाराष्ट्रातील हजारो कुटुंबांना होत आहे. - येथे वाचा संपूर्ण बातमी

हे ही वाचा सविस्तर

सत्तांतरानंतर आज शिंदे-फडणवीस सरकार प्रथमच आपला अर्थसंकल्प सादर करत आहेत. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणीस यांच्याकडे अर्थविभागाचा कारभार आहे. त्यामुळे अर्थमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांचाही हा पहिलाच अर्थसंकल्प आहे. - LIVE महाराष्ट्राचा अर्थसंकल्प वाचा सविस्तर

केंद्राप्रमाणे राज्य सरकारही देणार शेतकरी सन्मान निधी:वार्षिक 12 हजार रुपये मिळणार, केवळ एका रुपयात पीक विमा

केंद्राप्रमाणे राज्य सरकारही शेतकऱ्यांना महासन्मान निधी देणार. केंद्र सरकारचे 6 हजार रुपये आणि राज्याचे 6 हजार रुपये, याप्रमाणे शेतकऱ्यांना वार्षिक 12 हजार रुपये मिळतील, अशी महत्त्वपूर्ण घोषणा देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. - येथे वाचा संपूर्ण बातमी

बातम्या आणखी आहेत...