आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

आंदोलन:महायुती 1 ऑगस्ट रोजी राज्यभर करणार पुन्हा दूध आंदोलन, मुंबईत झालेल्या बैठकीत झाला निर्णय

मुंबई3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • राज्य सरकारने दूध उत्पादकांच्या मागण्या मान्य न केल्याने आंदोलन

राज्य सरकारने दूध उत्पादकांच्या मागण्या मान्य न केल्याने भाजप, रयत क्रांती, रिपब्लिकन पक्ष (आठवले गट) रासप आणि शिवसंग्राम महायुती यांच्या वतीने १ ऑगस्ट रोजी राज्यभर आंदोलन करण्यात येणार आहे. महायुतीच्या रविवारी मुंबईत झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला, अशी माहिती भाजप प्रदेश सरचिटणीस आमदार सुजितसिंह ठाकूर यांनी दिली.

या बैठकीला भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, महादेव जानकर, सदाभाऊ खोत, विनायक मेटे, अविनाश महातेकर, भाजप किसान मोर्चा प्रदेशाध्यक्ष डॉ. अनिल बोंडे आदी उपस्थित होते.

प्रतिलिटर १० रुपये अनुदान शेतकऱ्यांच्या थेट बँक खात्यावर जमा करण्यात यावे, दूध भुकटीच्या निर्यातीसाठी प्रतिकिलो ५० रूपये अनुदान द्यावे अशा मागण्या आहेत.