आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मविआचे चारही उमेदवार जिंकतील:संजय राऊत यांनी व्यक्त केला विश्वास, 'आघाडीत बिघाडी' या भाजपने पसरवलेल्या बातम्या

21 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

राज्यसभा निवडणुकीत महाविकास आघाडीचे चारही उमेदवार जिंकून येतील, असा विश्वास शिवसेना नेते संजय राऊत यांनी व्यक्त केला आहे. आज होत असलेल्या निवडणुकीसाठी भाजप, काँग्रेस, राष्ट्रवादी व शिवसेनेचे आमदार विधानसभेत दाखल होत आहेत. सकाळी 9 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत आमदारांना आपले मत देता येणार आहे. सायंकाळी 7 वाजता निकाल स्पष्ट होणार आहे.

सकाळी 9 वाजता मतदानाला सुरुवात होताच संजय राऊत यांनी पत्रकार परिषद घेत मविआच्या विजयाचा विश्वास व्यक्त केला. दरम्यान, आज सकाळी मतांवरून राष्ट्रवादी काँग्रेस व शिवसेनेत वाद झाल्याचे वृत्त माध्यमांमध्ये झळकले होते. आपल्या उमेदवारासाठी राष्ट्रवादीने मतांचा कोटा 42 वरून 44 केला. त्यामुळे शिवसेनेची दोन मते कमी होणार असल्याने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे प्रचंड संतप्त झाल्याचे माध्यमांद्वारे सांगण्यात आले होते. मात्र, 'आघाडीत बिघाडी' या भाजपने पसरवलेल्या बातम्या आहेत. मविआत कोणीही नाराज नाही. मविआचे सर्व उमेदवार जिंकून यावेत, यासाठी प्रत्येक जण मदत करत आहे, असे संजय राऊत यांनी स्पष्ट केले.

मलिक, देशमुखांबाबत हायकोर्टाकडून अपेक्षा

राष्ट्रवादीचे दोन आमदार नवाब मलिक आणि अनिल देशमुख यांचा मतदान करण्यासाठी परवानगी देण्याचा अर्ज काल विशेष पीएमएलए न्यायालयाने फेटाळून लावला होता. त्यावर आज हायकोर्टात सुनावणी होणार आहे. याबाबत आज आम्हाला हायकोर्टाकडून अपेक्षा असल्याचे संजय राऊत म्हणाले. या दोन्ही नेत्यांनी हत्या केलेल्या नाहीत. मतदान हा त्यांचा घटनादत्त अधिकार आहे. मात्र, केंद्राच्या दबावाखाली त्यांचा अधिकार डावलला जात आहे. आम्हाला न्यायव्यवस्थेवर पूर्ण विश्वास आहे, असे संजय राऊत म्हणाले.

एमआयएमचा काँग्रेसला पाठिंबा

एमआयएमच्या दोन आमदारांनी काँग्रेस आमदाराला पाठिंबा जाहीर केला आहे. याचे स्वागत संजय राऊत यांनी केले. तसेच, एमआयएमसोबत आमचे वैचारिक मतभेद आहेत. मात्र, भाजपला दूर ठेवण्यासाठी त्यांनी घेतलेल्या निर्णयाचे आम्ही स्वागत करतो, असे संजय राऊत म्हणाले.

बातम्या आणखी आहेत...