आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

पोलिस दलात फेरबदल:विरोधी पक्षाने नेहमीप्रमाणे टीकेचे तुणतुणे वाजविले; पण बदल्या तर होणारच, शिवसेनेकडून विरोधकांचा समाचार

मुंबई3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • बदल्यांचा आदेश निघाल्यापासून विरोधी पक्षांचा गुदमरलेला श्वास पाहता सरकारने पोलिसांच्या बदल्या करून चांगलेच केले हे मानायला जागा आहे

ठाकरे सरकारने पोलिस दलात मोठे फेरबदल केले आहेत. राज्यातील 40 पेक्षा अधिक वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या बदलीचे आदेश जारी करण्यात आले. यानंतर विरोधपक्षाने बदली वरुन टीकास्त्र सोडण्यास सुरुवात करण्यात आली. आता याच टीकेवर आज सामना अग्रलेखातून विरोधी पक्षाचा खरपूस शब्दात समाचार घेण्यात आला आहे.

'गृहमंत्री अनिल देशमुख, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, अजित पवार, काँग्रेसचे बाळासाहेब थोरात अशा नेत्यांनी एकत्र बसून पोलीस अधिकाऱ्यांच्या बदलीचे पत्ते पिसले आहेत हे स्पष्ट दिसते. कोणत्याही कुरबुरी न होता हे बदल झाले हे महत्त्वाचे. बाकी विरोधक काय बोलतात व टीका करतात याकडे फार लक्ष देण्याची गरज नाही. मर्जीतले अधिकारी त्यांनी त्यांच्या काळात नेमले. आता कर्तबगारी, राज्याची गरज पाहून नेमणुका झाल्या. त्यामुळे कोणी कितीही टीका केली तरी सरकारचा व्यवहार जनतेच्या सुरक्षेशी असतो, त्याबाबत व्यवहार चोख झाला आहे असे सांगता यावे अशा प्रकारे पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या झाल्या आहेत.'असं सामनाच्या अग्रलेखात म्हटलं आहे.

अग्रलेखात नेमके काय?

  • पोलीस दलात प्रथमच मोठे फेरबदल करण्यात आले आहेत. यावर विरोधी पक्षाने नेहमीप्रमाणे टीकेचे तुणतुणे वाजविले आहे. सरकारला बदल्यांशिवाय दुसरे काहीच काम नाही किंवा बदल्यांचे दुकान उघडले आहे असे नेहमीचेच ठेवणीतले टीकास्र सोडले आहे.
  • चंद्रकांतदादा पाटील वगैरे नेत्यांनी त्याहीपुढे जाऊन टीकेच्या डफावर थाप मारत सांगितले आहे की, ‘‘थांबा, आता बदल्यांमागचा हिशेबच जाहीर करतो.’’ हिशेबाची वही आधीच्या सरकारने ठेवली असावी असे एकंदरीत पाटलांच्या विधानावरून दिसते.
  • बदल्यांचा आदेश निघाल्यापासून विरोधी पक्षांचा गुदमरलेला श्वास पाहता सरकारने पोलिसांच्या बदल्या करून चांगलेच केले हे मानायला जागा आहे.
  • आता ज्या पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या झाल्या आहेत, त्याचा अभ्यास विरोधकांनी केला तर इतक्या पारदर्शक बदल्या आणि नेमणुका यापूर्वी कधीच झाल्या नाहीत याची खात्री त्यांना पटेल.
  • देवेन भारती हे दहशतवादीविरोधी पथकाचे (एटीएस) काम उत्तम प्रकारे करत होते. त्यांचा दरारा, नावलौकिक चांगला होता. त्यांना मुंबई-महाराष्ट्रातील गुन्हेगारी जगताची खडान्खडा माहिती होती. तरीही त्यांचा बराच कार्यकाळ बाकी असताना त्यांची बदली का झाली? हा एक प्रश्न अनेकांना पडला तरी इतरांच्या बाबतीत कोणतीही शंका घेण्याचे कारण दिसत नाही.
  • कोविड काळात तुरुंग महानिरीक्षक म्हणून उत्तम काम केलेले दीपक पांडे हे नाशिकचे आयुक्त झाले. हे सर्व पडद्यामागे राहून काम करणारे अधिकारी प्रत्यक्ष ‘फिल्ड’वर येऊन काम करण्याची संधी शोधत असतात.
  • अनेकदा त्यांना ‘लॉबिंग’ वगैरे जमत नाही. अशा चाणाक्ष अधिकाऱ्यांना हेरून प्रशासनाच्या मूळ प्रवाहात आणणे हेच राजकीय नेतृत्वाचे काम असते.
  • मुंबईचे सहआयुक्त (गुन्हे) म्हणून मिलिंद भारंबे, मुंबईच्या वाहतूक नियंत्रणाची जबाबदारी सहआयुक्त म्हणून यादवांवर पडली आहे. हे सर्व कर्तबगार अधिकारी आहेत आणि त्यांच्या नेमणुकांवर टीका करणे म्हणजे पोलीस दलाचे खच्चीकरण करण्याचेच प्रयोग आहेत