ठाणे दणाणले:शिंदेंचा पक्ष नाही, चोरांची टोळी, हे सरकार काही तासांचे; आदित्य ठाकरेंचा हल्लाबोल, महाराष्ट्रात गुजरातचे मुख्यमंत्री बसल्याचा टोला
- बावनकुळेंमध्ये इतकी ताकद तर फडणवीसांनी त्यांचे तिकीट का कापले, सुषमा अंधारेंचा सवाल.
- दादागिरी करून पक्ष वाढत नसतो; लोकांना जीव लावावा लागतो, आव्हाडांचा मुख्यमंत्री शिंदेंना टोला.
- रोशनींच्या पोस्टमध्ये अश्लील नाही, आव्हाडांकडून पाठराखण; आहेर, करमुसेप्रकरणाचे फोटो दाखवत 'चिंगारी आग में बदल जाएगी'चा इशारा.
एकनाथ शिंदे यांचा पक्ष नाही, तर ही चोरांची टोळी आहे. हे सरकार काही तासांचे आहे. महाराष्ट्रात गुजरातचे मुख्यमंत्री बसले आहेत, अशी घणाघाती टीका बुधवारी ठाण्यात काढलेल्या महाविकास आघाडीच्या महामोर्चाच्या सभेत आदित्य ठाकरे यांनी केली. या मोर्चात राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड, विद्या चव्हाण, ठाकरे गटाच्या सुषमा अंधारे, विनायक राऊत सहभागी झाले.
रोशनी शिंदे यांना झालेल्या मारहाणप्रकरणी हा मोर्चा काढण्यात आला. मोर्चाचा समारोप सभेने झाला. यावेळी आदित्य ठाकरे, जितेंद्र आव्हाड, सुषमा अंधारे यांची भाषणे झाली.
अपडेट
- पाठीवर वार करणाऱ्यांनी समोर येत लढावं, मी एकटा तुमच्याविरोधात लढण्यासाठी तयार आहे, हे राज्य छळमुक्त केल्याशिवाय राहणार नाही, तर माझ्या नादाला लागलात तर तुमचे नाव विसरायला भाग पाडेल असा इशाराच त्यांनी विरोधकांना दिला आहे.
- गद्दारांच्या बद्दल लोकांच्या मनात संताप आहे, तो दिसून येतोय. मला प्रत्येक ठिकाणरी लोक सांगताय तुमच्यासोबत आहे. आम्हाला मोर्चा काढण्यासाठी अटी घालण्यात आला, आम्ही आयुक्तांच्या ऑफीससाठी मोठे कुलुप आणले आहे. असा टोला आदित्य ठाकरेंनी लगावला आहे.
- गद्दारांमुळे देवेंद्र फडणवीस यांचे नाव खराब होत आहे. मोक्का लागलेली माणसं पुण्यात फिरताना दिसून येत होते. पोलिस काही करु शकत नाही कारण तिथे मुख्यमंत्री फोन करतात काही बोलू नका. महाराष्ट्रात एवढं गलिच्छ राजकारण कधी पाहिले नाही, असा टोला आदित्य ठाकरेंनी लगावला आहे.
- फेसबूक लाईव्ह करत त्यांनी देशाचे पंतप्रधान बदलून टाकले, दिल्लीत जात त्यांनी ठाकरे अडनाव मिळते का याची चाचपणी देखील केली असा टोलाही आदित्य ठाकरेंनी लगावला आहे. पुण्यात येणारा प्रकल्प गुजरातमध्ये पाठवला, अनेक प्रकल्प महाराष्ट्रातून गुजरातला गेले, अजून किती प्रकल्प त्यांना देणार असा संतप्त सवालही आदित्य ठाकरेंनी केला आहे.
- गुजरातला दोन मुख्यमंत्री मिळाले आहे, आम्हाला एकतरी मुख्यमंत्री द्यावर अशी खोचक टीकाही आदित्य ठाकरेंनी एकनाथ शिंदेंना लगावला आहे.
- आम्ही लवकरच येणार असून गद्दारांना त्यांची जागा दाखवणार आहोत- आदित्य ठाकरे, या सरकारच्या राज्यात मोठ्या प्रमाणावर आत्महत्या होत आहे. महिला राज्यात सुरक्षित दिसून येत नाहीये, एका व्यक्तीच्या स्वार्थासाठी राज्य अंधारात गेले.
- घटनाबाह्य मुख्यमंत्र्यांच्या शहरात जर अशी घटना घडली असली तरी त्यांना काही वाटत नाही. ठाण्याला तुम्ही देशभरात बदनाम केले, माफीचा व्हिडिओ बनवून घेतला तरी तिच्या पोटात लाता मारल्या गेल्या. ठाण्यात येऊन मी जिंकून दाखवणार असेही आदित्य ठाकरेंनी म्हटले आहे. रोशनी शिंदे यांना महिला आणि पुरुषांकडून मारहाण करण्यात आली.
- महिलेवर हल्ला झाला आणि तिच्यावरच गुन्हा दाखल करण्यात येतो, आणि त्यांचे माजी महापौर समर्थन करतात हे अयोग्य आहे. सुसंक्कृत ठाणे यामुळे एकदम बदनाम झाले. असा आरोप आदित्य ठाकरेंनी केला आहे.
- हे सरकार काही तासांचे आहे, सुप्रीया सुळे आणि सुषमा अंधारेंबद्दल अगदी वाईटठ बोलेल जाते, महिला सुरचात नसताना मुख्यमंत्री शांत बसतात हे कौतुक करण्यासारखे आहे, असा टोला आदित्य ठाकरेंनी लगावला आहे.
- चोराचा पक्ष कधी असू शकतो का? ती टोळी आहे. शिंदेच्या लोकांनी महिलेवर हात उचलले जातात, तिची तक्रार दाखल करुण घेतली जात नाही. महाराष्ट्रातले नाही तर गुवाहटीचे मुख्यमंत्री आहे, आदित्य ठाकरेंचा जोरदार हल्लाबोल. आम्ही बदल्याच्या भूमिकेत काम करत नाही, पण जे करणे गरजेचे आहे, ते करणारच. आमचे सरकार येताच सर्व जणांची चौकशी लावणार असा इशारा आदित्य ठाकरेंनी पोलिसांना दाखवला आहे.
- महेश आहेर यांचे रोजचे उत्पन्न 40 लाख तर महिन्याचे 12 कोटी असताना त्यांच्यावर कारवाई का नाही. जितेंद्र आव्हाड यांना गुन्हेगार ठरविण्यासाठी लोकांना 12 ते 14 तास रोज त्रास दिला जातोय, असा आरोप वैभव कदम यांचया आत्महत्येवरुन आव्हाड यांनी केला आहे. भरसभेत करमुसे प्रकरणाचा उल्लेख करत फोटो दाखवत 'चिंगारी आग में बदल जाएगी'चा आव्हाडांचा इशारा
- रोशनी शिंदे यांच्या सर्व पोस्ट मी वाचल्या, तिच्या पोस्ट शिवसेनेच्या संस्करातील होत्या, तिने आक्षेपार्ह वक्तव्य केले नाही. गर्भशयाचे ऑपरेशन सुरू आसताना तिला मारले गेले हेच तुमचे संस्कार आहे का असा सवाल जितेंद्र आव्हाड यांनी उपस्थित केला.
- 67 देशांनी तुमच्या या संस्कारांची नोंद घेतली, एखाद्या महिलेला तुम्ही आई होऊ नये म्हणून मारता हेच का तुमचे संस्कार का असा सवाल आव्हाड यांनी उपस्थित केला आहे. सुभाषसिंग ठाकूर तोच आहे ज्याने जेजे च्या हत्याकांडात 4 पोलिसांना मारले.
- माझ्या मुलीला सारख्या धमक्या येत होत्या मी आणि एकनाथ शिंदे यांनी 30 वर्षे सोबत एकाच शहरात राजकारण केले आहे, आमचे वैचारिक मतभेद असतील मात्र त्यांनी एकही कॉल केला नाही, असेही आव्हाड यांनी म्हटले आहे.
- महेश आहेर यांची तक्रार करुणही गुन्हा दाखल झाला नाही - आव्हाड
- पोलिसांच्या खांद्यावर बंदूक ठेवत मविआच्या कार्यकर्त्यांवर खोटे गुन्हे राज्य सरकारकडून दाखल करण्यात येत आहे, असा आरोप खासदार राजन विचारे यांनी केला आहे. पोलिस जे वागताय ते वागणं बरे नव्हे असेही त्यांनी म्हटले आहे.
- उद्धव ठाकरेंसाठी आम्ही सगळे तयार आहोत, ते तोफ आहेत. त्यांच्यापुढे काडतूस काय आहे- सुषमा अंधारे
- महिला जर गरोदर नसेल तर तिच्या पोटात लात मारणे योग्य आहे का?, असा सवाल शिवसेनेच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी उपस्थित केला. जर पोलिस अधिकारी भेटायला तयार नाही, गृहमंत्र्यांना काहीच दिसत नाही तर मुख्यमंत्र्यांना सुरत गुवाहटी, गोवा शिवाय काही महत्त्वाचे नाही. पोलिसांनी तक्रार दाखल न केल्याने आम्ही मोर्चा काढला.
- छत्रपती शिवरायांच्या बद्दल लाड लोढा कोशारी यांनी असभ्य भाषा वापरली पण भक्त अजिबात चिडले नाहीत. विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर, कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या बद्दल चंद्रकांत पाटील यांनी असभ्य भाषा वापरली पण भक्त अजिबात चिडले नाहीत. क्रांतीबा ज्योतिबा फुले यांच्या बद्दल कोश्यारी यांनी अश्लाघ्य भाषा वापरली पण भक्त अजिबात चिडले नाहीत. मग केवळ फडतूस शब्द वापरताच भक्त कसे चिडले असा सवालही अंधारे यांनी उपस्थित केला.
- फडतूस म्हटले तर तुम्हाला वाईट वाटते, आणि दादा, भाऊ म्हटले तर फडतूस आमदार आमच्याबद्दल काय म्हणतात, त्यांच्यावर गुन्हे दाखल का होत नाही, अंधारे यांचा सवाल.
- बावनकुळेमध्ये इतकी ताकद असेल तर त्यांचे फडणवीसांनी तिकीट का कापले, सुषमा अंधारेंचा सवाल.
- ज्यांनी महाराष्ट्र आणि हा अवघा देश घडवला त्या महापुरुषांबद्दल अवमानकारक अवहेलनात्मक शब्द उच्चारले तरीही भक्त बोलत नाही फक्त फडतूस या शब्दावर मात्र चेकाळतात याचा अर्थ भक्तांची चॉईस किती फडतूस आहे हे लक्षातच आले असेल?
ठाकरे गटाच्या मोर्चा आणि सभेला अखेर ठाणे पोलिसांकडून परवानगी देण्यात आली आहे. रोशनी शिंदे प्रकरणात पोलिसांनी पक्षपातीपणा केला असा आरोप ठाकरे गटाने केला होता.
मविआचे हे नेते सहभागी
ठाण्यातील मोर्चाला सुरुवात झाली असून माजी मंत्री आदित्य ठाकरे, विनायक राऊत, जितेंद्र आव्हाड आणि विक्रांत चव्हाण सुनील राऊत, राजन विचारे, केदार दिघे मोर्चाचे नेतृत्व करत आहेत. ठाकरे गटाच्या रोशनी शिंदे यांना सोमवारी संध्याकाळी मारहाण करण्यात आली. यानंतर माजी मुख्यमंत्री उद्धव आणि रश्मी ठाकरे यांनी मंगळवारी रुग्णालयात जाऊन त्यांची विचारपूस केली.
या आहेत अटी
- पोलिसांनी या मोर्चाला अटी आणि शर्थींसह परवानगी दिली आहे.
- मोर्चा हा वेळेत संपवण्यात यावा, शांततेने, शिस्तीने व कोणत्याही प्रकारे गोंधळ न सभा पार पाडावी.
- मोर्चा दरम्यान कोणतेही आक्षेपार्ह देखावे फलक, चित्रे, चिन्हे व आकृत्या प्रदर्शित करू नये.
- कोणत्याही व्यक्तीच्या जातीच्या भावना दुखावतील अशी वक्तव्य, भाष्य, घोषणा, हालचाली करू नये.
- कायदा व सुव्यस्थेचा प्रश्न निर्माण करु नये या अटी ठेवण्यात आल्या आहेत.