आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

राजकारण:महाविकास आघाडी स्थानिक स्वराज्य संस्थाही एकत्र लढणार; शिवसेनेचे मंत्री, नेत्यांच्या बैठकीत निर्णय

मुंबईएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक
  • उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत निर्णय, मात्र कोणत्याही पक्षाकडून अधिकृत घोषणा नाही

आगामी मनपा, नगरपालिकांसह स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका महाविकास आघाडीच्या झेंड्याखाली एकत्र लढवण्याचा निर्णय बुधवारी शिवसेनेने घेतला. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली बुधवारी शिवसेनेचे मंत्री, नेत्यांची बैठक बुधवारी ‘वर्षा’ बंगल्यावर झाली. या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. कोरोनामुळे पुढे ढकलण्यात आलेली औरंगाबाद मनपाची निवडणूक आगामी काळात होणार असून त्या दृष्टीने शिवसेनेचा हा निर्णय महत्त्वपूर्ण समजला जात आहे. नुकत्याच झालेल्या विधान परिषदेच्या ६ जागांसाठी झालेल्या निवडणुकीत महाविकास आघाडीने ५ जागा जिंकल्या होत्या. तीन पक्ष एकत्र आल्यास भाजपच्या विजयरथाला रोखणे शक्य असल्याचे दिसून आल्यामुळे आघाडीच्या झेंड्याखाली निवडणूक लढवण्याचे या बैठकीत ठरले. आगामी महापालिका तसेच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका एकत्र लढवण्याचे बैठकीत ठरले असून असून मुख्यमंत्र्यांचा आदेशानुसार याबाबत निर्णय घेतला जाईल, असे महसूल राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.

Open Divya Marathi in...
  • Divya Marathi App
  • BrowserBrowser