आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Local
  • Maharashtra
  • Mumbai
  • Mahavikas Aghadi : Shiv Sena MPs Think When Will This Government Fall In The State! Union Minister Of State Kapil Patil's Sensational Claim

दावा:शिवसेनेच्याच खासदारांना वाटते राज्यातील हे सरकार कधी पडते! केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील यांचा खळबळजनक दावा

ठाणे3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

राज्यातील महाविकास आघाडीचे हे सरकार कधी पडते, असे सत्ताधारी शिवसेनेच्याच खासदारांना वाटते आहे, असा दावा केंद्रीय पंचायत राज मंत्री कपिल पाटील यांनी केला.

भाजपच्या ओबीसी जागर अभियानाच्या कोकण विभागीय मेळाव्यात पाटील म्हणाले, शिवसेनेचे खासदार मला अनेक वेळा भेटतात. त्यांच्या खासगीतील चर्चा, शेरे माझ्याकडे भरपूर आहेत. आता त्यांनाच त्यांचे सरकार कधी पडतेय, अशी भावना त्यांची झाली आहे. देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना आम्हाला कुठल्याही कामाला कधीच नकार आला नाही. फडणवीस यांची काम करण्याची पद्धत उत्तम होती, असे शिवसेना खासदार आपल्याला नेहमीच सांगत असतात,’ असे पाटील यांनी सांगितले.

मेळाव्यात आघाडी सरकारवर हल्ला चढवत विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस म्हणाले की, ‘इम्पिरिकल डेटा व जनगणनेचा डेटा यात आघाडी सरकार बुद्धिभेद करत आहे. केंद्राकडील जनगणनेच्या डेटाचा आरक्षणाशी संबंध नाही. आरक्षणासाठी इम्पिरिकल डेटा हवा असतो. तो राज्य सरकारच मागासवर्ग आयोगाकडून मिळवू शकते.’

शिवसेनेचा पलटवार : कपिल पाटील यांच्या बेताल वक्तव्याला शिवसेना महत्त्व देत नाही. क्षमता नसताना मंत्रिपद मिळाले की काहींचे हात स्वर्गाला टेकतात. त्यातील एक हे पाटील आहेत, असा टोला शिवसेनेचे खासदार विनायक राऊत यांनी लगावला.

बातम्या आणखी आहेत...