आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

कुरबुरी:राष्ट्रवादीच्या ‘दादागिरी’ने शिवसेना, काँग्रेस त्रस्त; धुसफूस काही थांबेना, उपमुख्यमंत्री अजित पवार ऐकेनात अन् मुख्यमंत्री उद्धव ठाकरे भेटेनात

मुंबई3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

महाराष्ट्र विकास आघाडीतील धुसफूस संपायचे नाव घेत नाही. स्वपक्षाच्या ताब्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांना मिळणारा निधी, अधिकाऱ्यांच्या बदल्या, वित्त विभागांत नस्ती लटकणे अन् टाळेबंदी याप्रश्नी राज्य सरकारमध्ये धुसफूस कायम आहे. आश्चर्य म्हणजे काँग्रेसच्या मंत्र्यांसह मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या स्वपक्षाचे आमदार राष्ट्रवादीच्या दादागिरीने हतबल आहेत.

जालन्याचे काँग्रेस आमदार कैलास गोरंट्याल यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेसच्या ११ आमदारांनी उपोषणाची तयारी केली होती. परंतु, त्यांना अर्थमंत्री अजित पवार यांचा शब्द मिळाल्याने त्यांनी ऐनवेळी उपोषण मागे घेतले. काँग्रेसचे विधिमंडळ नेते व महसूलमंत्री बाळासाहेब थाेरात यांनी काही पक्षांच्या आमदारांना अधिकविकास निधी मिळत असल्याची जाहीर टिप्पणी केली आहे.

शिवसेनेने विकास निधीची दुजाभावाबाबत हात झटकले आहेत. काँग्रेसचे आमदार नाराज असतील तर तो काँग्रेसचा प्रश्न आहे. निधी वाटपाविषयी त्यांचे काही आक्षेप असतील तर अर्थमंत्री अजित पवार त्यावर उत्तर देतील, अशी शिवसेनेची भूमिका आहे. अर्थमंत्री अजित पवार पैसे देत नाहीत अन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे भेटत नाहीत,अशी काँग्रेस आमदारांची गोची झाली आहे.

राष्ट्रावादीच्या खासदार सुप्रिया सुळे या व्यायामशाळा आणि चित्रपटगृहांना टाळेबंदीतून सूट द्यावी, अशी मुख्यमंत्र्यांना सातत्याने मागणी करत आहेत. मात्र मुख्यमंत्री टाळेबंदीत सूट देण्यास तयार नाहीत. बकरी ईदला बकरा खरेदी आॅनलाइन केल्याप्रकरणी काँग्रेसचे आमदार मुख्यमंत्र्यांवर नाराज आहेत. अर्थसंकल्पात जी तरतूद केली जाते. तो निधी वित्तमंत्रालयाकडे असते. त्यामुळे जोवर वित्त विभाग त्याला संमती देत नाही, तोपर्यंत निधी मिळू शकत नाही. अर्थ विभाग उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हाती आहे. त्यामुळे काँग्रेसह शिवसेनेचे आमदार वैतागले आहेत.

आयएएस, आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे अधिकार मुख्यमंत्र्यांना आहेत. यंदा कोरोना महामारीमुळे १५ टक्के बदल्या होत आहेत. ज्या बदल्या झाल्या त्या शिवसेना अन् राष्ट्रवादीला हव्या असणाऱ्या झाल्या. मात्र, काँग्रेसच्या मंत्र्यांना हव्या असणाऱ्या बदल्या न झाल्याने काँग्रेसमध्ये नाराजी कायम आहे.

विकास निधीत दुजाभाव होत असल्याचा होतोय आरोप
सुशांतसिंह आत्महत्या तपास, मुंबई पोलिसांच्या बदल्या या प्रकरणानंतर महाराष्ट्र विकास आघाडीच्या सरकारात निधी वाटपातील दुजाभाव हे धुसफूसचे कारण ठरले आहे. पावसाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर ही धुसफूस समोर आल्याने विरोधकांचा आत्मविश्वास दुणावला आहे.

पालकमंत्र्यांवर अाेढवली हात चाेळत बसण्याची वेळ
कोविडच्या ज्या उपाययोजना झाल्या त्या मुख्यमंत्र्यांच्या मुंबईत, उपमुख्यमंत्र्यांच्या पुण्यात झाल्या. अधिक निधी या दोन शहरात खर्च करण्यात आला. त्यामुळे इतर जिल्ह्याच्या पालकमंत्र्यांवर हात चाेळत बसण्याची वेळ ओढवली आहे.