आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

फडणवीसांचे धक्कातंत्र:महाविकास आघाडीची 21 मते फुटली! भाजपच्या पारड्यात पडली; सत्ताधारी चित

औरंगाबाद I मनोज साखरे12 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

राज्यसभा निवडणुकीत पराभवाचा मोठा धक्का बसलेल्या महाविकास आघाडीला विधान परिषदेच्या निवडणुकीतही मोठा धक्का बसला. त्याचे महत्वाचे कारण म्हणजे या निवडणुकीत महाविकास आघाडीचे 21 मते फुटली आहेत. तर हिच 21 मते भाजपच्या पारड्यात पडली आणि पाचव्या उमेदवारासाठी एकही मत नसलेल्या भाजपने पाचवा उमेदवार विजयी केला आणि दोन्ही निवडणुकीत भाजपने सत्ताधाऱ्यांचा धुव्वा उडवत पाणी पाजण्याची किमया साधली.

काँग्रेसची मते फुटली

संख्याबळ 113 असताना भाजपने 134 मते विधान परिषदेच्या निवडणुकीत मिळवली आहेत. अर्थातच महाविकास आघाडीचे आमदार आपल्याकडे वळवण्याचे मोठे काम भाजपने केले आहे. या निवडणुकीत काँग्रेसला मोठा फटका बसला असे दिसते. मते फुटल्याचे नुकसान काँग्रेसला झाल्याचे दिसून येत आहे.

अशी आहे नामुष्की

शिवसेनेकडे अपक्षांसह पहिल्या पसंतीची सुमारे 63 मते होती. काॅंग्रेसकडे 44 मते होती परंतू, काॅंग्रेसच्या दोन्ही उमेदवारांना पहिल्या पसंतीची कोट्याइतकी मते मिळू शकली नाही. ही नामुष्की त्यांच्यावर ओढावली आहे. याचे शल्यही काँग्रेसने व्यक्त केली आहे. पक्षाची मते बाजूला गेली अर्थात ती भाजपकडे गेली असेही दिसून येत आहे.

राष्ट्रवादीने दाखवली ताकद

राष्ट्रवादी काॅंग्रेसचे उमेदवार रामराजे निंबाळकर यांना 29 आणि एकनाथ खडसे यांना 28 मते पहिल्या फेरीत मिळाली. त्यामुळे राष्ट्रवादी काॅंग्रेसने आपले उमेदवार सहज निवडून आणले. जेवढे संख्याबळ आहे त्यापेक्षा जास्त आमदारांच्या मते मिळवण्यात राष्ट्रवादी यशस्वी झाली आहे.

चंद्रकांत हंडोरे, भाई जगतापांना फटका

काॅंग्रेसचे उमेदवार चंद्रकांत हंडोरे यांना 22 व भाई जगताप यांना 19 पहिल्या पसंतीची मते मिळाली. म्हणजेच काॅंग्रेसकडे 44 मते असतानाही त्यांची तीन मते फुटली याचा फटका चंद्रकांत हंडोरे आणि भाई जगतापांना बसला. ''आमचीच मते फुटली आता मित्रपक्षांना दोष देऊन उपयोग काय?'' असा प्रतिप्रश्नही काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांनी विचारला.

राज्यसभेच्या तुलनेत भाजपची 11 मते वाढली

राज्यसभा निवडणुकीत भाजपला 123 मते मिळाली. परंतू भाजप नेते आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी सांगितल्यानुसार, विधान परिषदेत त्यांच्या सर्व उमेदवारांना 133 मते मिळाली अर्थातच भाजपला राज्यसभेच्या तुलनेत 11 मते अधिक मिळाली.

भाजपला एकूण 21 मतांचा लाभ

भाजपची सभागृहातील अपक्षांसह 113 आमदार आहेत. त्यापेक्षा 21 मते अधिक मते मिळवून भाजपचे पाचही उमेदवार निवडून आले आहेत. राज्यसभा निवडणुकीत किमया साधत विजयश्री संपादन केलेल्या देवेंद्र फडणवीसांनी याही निवडणुकीत चमत्कार करून वीस मते खेचून आणत महाविकास आघाडीला दुसऱ्यांदा धक्का दिला आहे.

बातम्या आणखी आहेत...