आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

संजय राऊतांची भाजपवर खोचक टीका:​​​​​​​राज्यसभेच्या चारही जागा 'मविआ'च जिंकणार; भाजपने पैसे वाया घालवू नये

मुंबईएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

राज्यसभेच्या चारही जागा महाविकास आघाडी जिंकेल. सहावी जागेवर देखील महाविकास आघाडीचा उमेदवार चांगल्या मतांनी विजयी होऊन राज्यसभेवर जाईल. भाजपने उगीचच पैसा वाया घालवू नये, पैसे असतील तर सामजिक कार्यासाठी वापरावे, अशी खोचक टीका शिवसेना खासदार संजय राऊतांनी भाजपवर केले आहे. ते आज मुंबईत पत्रकारांशी बोलत होते.

देवेंद्र फडणवीस हे मॅच्युअर नेते आहेत, राज्याची मुख्यमंत्रीपद सांभाळणारी व्यक्ती मॅच्युअर असायला पाहिजे, फडणवीस हे राज्याचे विरोधी पक्षनेते आहेत, काल राजसभेसाठी महाविकास आघाडीचे प्रमुख नेते त्यांच्याकडे जाऊन आले, चर्चेनंतर त्यांनी ठरवले आहे की, त्यांना ही निवडणूक लढवायची आहे, त्यामुळे कोणीच कोणाला रोखू शकत नाही. आम्ही देखील तेवढ्याच ताकदीने निवडणुकीला उतरलो आहोत, असे संजय राऊत म्हणाले.

शुक्रवारी राज्यसभेसाठी महाविकास आघाडीच्या प्रमुख नेत्यांनी फडणवीसांची भेट घेतले. त्यात महाविकास आघाडीने भाजला आपला उमेदवार मागू घेण्याचा सल्ला दिला होता. त्यावर आम्ही भाजपला विधान परिषदची एक जागा देवू अशी ऑफर देखील महाविकास आघाडीने दिली. त्यानंतर बोलताना देवेंद्र फडणवीस हे मॅच्युअर नेते आहेत, असे विधान संजय राऊतांनी केले होते. मात्र, भाजप निवडणूक लढवण्यावर ठाम आहे. तर महाविकास आघाडी देखील मोठ्या ताकदीने निवडणुकीसाठी उतरल्याचे संजय राऊत म्हणाले.

भाजप अपक्षावर अवलंबून

पुढे संजय राऊत म्हणाले की, प्रश्न राज्यसभेच्या सहाव्या जागेसाठी आहे. सहाव्या जागेसाठी भारतीय जनता पक्ष हे अपक्ष किंवा इतर पक्षांवर अबलंबून आहे. भाजप या पक्षाच्या आमदारांना आमिष दाखवणार, त्यांच्यावर दबाव आणणार, हा दबाव कशाप्रकारे टाकण्यात येतो याची माहिती आमच्याकडे रोज येत आहे, ज्यांच्यावर दबाव टाकण्यात येत आहे ते आमचे मित्र आहे ते आम्हाला सर्व काही सांगतात, असे राऊत म्हणाले.

भाजपचे चरित्र उघड

राज्यात ईडी, सरकारी यंत्रणांचा धाक देऊन निवडणूक लढवण्याचा भाजपचा प्रयत्न आहे. ही राज्याची जनता डोळसपणे पाहत आहे. सहावी जागा महाविकास आघाडी जिंकणार आहे, उगाच भाजपने त्यांचे पैसै वाया घालू नये. ते पैसै एखाद्या सामाजिक कार्यासाठी वापरावे, असा सल्ला देखील राऊतांनी भाजपला दिला आहे.

आमच्याकडे ईडी नाही

गेल्या 50 वर्षांपासून आम्ही निवडणुका लढवत आहोत. निवडणुकांचा सर्वात जास्त अनुभव आम्हाला आहे, फक्त आमच्या हातात ईडी नाही, असा टोला देखील राऊतांनी भाजपला लगावला आहे.

सहावी जागा शिवसेनेचीच

महाविकास आघाडीचे चारही उमेदवार जिंकणार आणि राज्यसभेत जाणार. सहाव्या जागेसाठी सर्वांच्या मनात शंका आहे, मात्र सहाव्या जागेवर शिवसेनाचा उमेदवार चांगल्या मताने निवडून येतील, असे विश्वास राऊतांनी यावेळी व्यक्त केला.

बातम्या आणखी आहेत...