आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

हृदयस्पर्शी दृष्य:10 महीन्यानंतर लोकल ट्रेनमध्ये प्रवेश करण्यापूर्वी प्रवाशाने टेकवलं डोकं, उद्योगपती आनंद महिंद्रा म्हणाले- ही आहे भारताची आत्मा

मुंबई2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • उद्योगपती आनंद महिंद्रा म्हणाले- ही आहे भारताची आत्मा

1 फेब्रुवारीपासून मुंबईची लाइफलाइन असलेली लोकल ट्रेन सेवा सामान्यांसाठी सुरू झाली आहे. तब्बल 10 महीन्यानंतर लोकल ट्रेन सुरू झाल्यामुळे सामान्य नागरिकांमध्ये आनंदाचे वाचावरण आहे. दरम्यान, एक फोटो समोर आला आहे, ज्यात एक व्यक्ती ट्रेनमध्ये चढण्यापूर्वी ट्रेनच्या पाया पडताना दिसत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, हा फोटो मुंबईतील सीएसएमटी स्टेशनच्या प्लॅटफॉर्म नंबर दोनवरील असून, एक फेब्रुवारीला घेतलेला आहे.

उद्योगपती आनंद महिंद्रा म्हणाले- ही आहे भारताची आत्मा

या ह्रदयस्पर्षी फोटोला उद्योगपती आनंद महिंद्रा यांनी आपल्या सोशल मीडिया अकाउंटवर पोस्ट केला आहे. आनंद यांनी या फोटोला भारताची आत्मा म्हटले आहे. सोशल मीडियावर आनंद यांनी लिहीले, 'भारताची आत्मा... याला आपण कधीही गमावणार नाही अशी मी प्रार्थना करतो.'

नियमांसह लोकल ट्रेन सुरू

320 दिवसानंतर रेल्वेने सामान्य नागरिकांना लोकलने प्रवास करण्याची परवानगी दिली. परंतु, यासाठी काही ठराविक वेळ ठरवण्यात आली आहे. सामान्य नागरिक सकाळी 7 ते 12 पर्यंत आणि संध्याकाळी 4 ते 9 दरम्यान लोकलने प्रवास करू शकतो.

बातम्या आणखी आहेत...