आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

लोकलसमोर लोखंडी ड्रम अन् त्यात 15-20 किलो दगडं:मोटरमनच्या समयसूचकतेमुळे घातपाताचा डाव उधळला, सर्वत्र होत आहे कौतुक

मुंबईएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

मोटरमनच्या सतर्कतेमुळे मुंबईतील लोकलसमोर एक मोठा अपघात टळला आहे. सँडहर्स्ट रोड-भायखळा स्थानकादरम्यान एका अज्ञात व्यक्तीने रुळावर 15 ते 20 किलो दगडाने भरलेला लोखंडी ड्रम ठेवला होता.

शुक्रवारी 3 वाजून 10 मिनिटांनी लोकल खोपोलीकडे निघाली होती. सँडहर्स्ट याठिकाणी तिने पुढचा थांबा घेतला. सँडहर्स्ट येथून पुढे लोकल गेल्यावर मोटरमनला रुळावर काहीतरी आढळून आले. त्यांनी अर्जंट ब्रेक दाबत लोकल थांबवली. व स्वतः उतरुन ते त्याठिकाणी गेले. त्यावेळी रुळावर एक ड्रम व त्यात 15 ते 20 किलो दगडं भरुन ठेवल्याचे आढळून आले. मोटरमन अशोक शर्मा यांच्या या समयसूचकतेमुळे मोठी जीवीतहानी टळली आहे. त्यामुळे त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.

सेंट्रल रेल्वेचे ट्वीट

प्रवाशांच्या मदतीने शर्मा यांनी तो ड्रम हटवला. आणि प्रवाशांनीही एकदाचा सुटकेचा निश्वास सोडला. या घटनेप्रकरणी अज्ञात व्यक्तीविरोधात पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मोटरमन आनंद शर्मा यांचे सध्या सर्वत्र कौतुक होत असून सेंट्रल रेल्वेनेही ट्वीट करत त्यांचे कौतुक केले आहे. ही लोकल पुढे कल्यानला रवाना झाल्याचे सांगण्यात आले. दरम्यान यामागे काही मोठा घातपाताचा कट होता का यासंदर्भात रेल्वे पोलिसांकडून चौकशी करण्यात येत आहे

बातम्या आणखी आहेत...