आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करामुंबईच्या परळ भागातील वाडिया रुग्णालयाला शुक्रवारी सायंकाळी आग लागली आहे. रुग्णालयातील ऑपरेशन थिएटरला ही आग लागली असून हे लहान मुलांचे आणि महिला प्रसूती रुग्णालय आहे. अग्निशमन दलाच्या चार गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहेत. अग्निशमन दलाच्या जवानांकडून आग विझविण्याचे प्रयत्न सुरू आहेत. आतापर्यंत कुणीही जखमी झाल्याची किंवा जीवितहानी झाल्याची माहिती समोर आलेली नाही.
वाडिया हॉस्पिटलला आग लागल्याचे कळाल्यानंतर राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दूरध्वनीवरून घटनेचा आढावा घेत तातडीने उपाययोजना करण्याच्या सूचना केल्या आहेत. घटनास्थळी अग्निशमन दलाचे ९ बंब दाखल झाले . त्यांनी काही वेळातच या आगीवर नियंत्रण मिळवले.
बंद ऑपरेशन थिएटरमध्ये आग लागली होती. मात्र ती नेमकी कशामुळे लागली याचे कारण रात्री उशिरापर्यंत समजू शकले नाही. आग आटोक्यात आल्याने मोठी वित्तीय हानी टळली आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.