आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मुंबईमध्ये अपघात टळला:5 मजली इमारतीचा मोठा भाग कोसळला, आत अडकलेल्या 40 लोकांना सुरक्षित काढले बाहेर

मुंबईएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक
  • इमारतीत दुरुस्तीचे काम सुरू होते

मुंबईत शुक्रवारी सकाळी इमारतीचा मोठा भाग अचानक कोसळला. अपघातादरम्यान इमारतीत 40 हून अधिक लोक उपस्थित होते. सर्व लोकांना सुखरुप बाहेर काढले गेले आहे. चांगली गोष्ट म्हणजे या अपघातात कुणीही जखमी असल्याचे वृत्त नाही.

मदत आणि बचाव कार्यासाठी अग्निशमन दल आणि रुग्णवाहिका घटनास्थळी उपस्थित आहेत. घटनास्थळी उपस्थित असलेल्या पोलिस अधिकाऱ्याने सांगितले की, अपघातानंतर तत्काळ बचावकार्य सुरू करण्यात आले. इमारत का कोसळली यामागील कारणांचीही चौकशी केली जाईल.

इमारतीत दुरुस्तीचे काम सुरू होते
म्हाडाची ही इमारत 40 ते 45 वर्षे जुनी आहे आणि त्यातील आतील भागात दुरुस्तीची गरज आहे. इमारतीत दुरुस्तीचे काम सुरू असताना हा अपघात झाला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, इमारतीच्या तिसर्‍या आणि चौथ्या मजल्यावरील स्लॅब कोसळले आहेत. पाऊस पाहता महापालिकेला अनेक इमारती दुरुस्त केल्या जात आहेत.

मलाडमध्येही अशीच घटना घडली
यापूर्वी 11 जून रोजी मुंबईच्या मलाडमध्ये एक इमारत कोसळली होती. या अपघातात 12 जणांचा जीव गेला होता. मृतांमध्ये आठ अल्पवयीन मुलेही सामिल होती. तर 18 जणांना घटनास्थळावरून वाचवण्यात आले होते.

बातम्या आणखी आहेत...