आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

डोसमधील अंतर:कोरोना लसीच्या दोन डोसमधीलअंतर 28 दिवसांचे करा : महाराष्ट्राची केंद्र सरकारकडे पुन्हा मागणी

मुंबई12 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

कोविड लसीकरण जलद गतीने करण्याच्या दृष्टीने कोविशील्डच्या दोन डोसमधील अंतर ८४ दिवसांवरून २८ दिवसांपर्यंत करता येईल का याचा फेरविचार करावा, अशी मुख्य मागणी महाराष्ट्राने केंद्र सरकारकडे केली आहे. केंद्रीय आरोग्यमंत्री मनसुख मांडविया यांची नवी दिल्ली येथे राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी मंगळवारी भेट घेतली. त्यानंतर ते बोलत होते.

आरोग्य कर्मचाऱ्यांना कोविड लसीचा बूस्टर डोस देण्याबाबत विचार करावा. १८ वर्षांखालील मुलांचे कोविड लसीकरण लवकरात लवकर सुरू करण्यात यावे, असे निवेदन केंद्राला दिले आहे, असे टोपे म्हणाले.

संभाव्य तिसऱ्या लाटेचा धोका लक्षात घेता राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत कोविडसंबंधी मनुष्यबळ उपलब्ध करण्यासाठी निधी पुरवणी पीआयपीमध्ये उपलब्ध करून देण्यात यावा, अशी मागणी मांडवीय यांच्याकडे करण्यात आली आहे.

लसीकरणासाठी सलमानची मदत
लोकांनी कोरोना प्रतिबंधक लस घ्यावी म्हणून प्रोत्साहित करण्यासाठी महाराष्ट्र सरकार बॉलीवूड अभिनेता सलमान खानची मदत घेणार आहे. विशेष करून मुस्लिमबहुल भागांत लसीकरणाबाबत असलेल्या अनिच्छेकडे पाहता सरकार हे पाऊल उचलत आहे.

बातम्या आणखी आहेत...