आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

कार्यालयीन वेळ:मंत्रालयातील कार्यालयाच्या वेळा दोन शिफ्टमध्ये करा : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

मुंबई10 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

कोविडच्या पार्श्वभूमीवर मंत्रालयातील कार्यालयीन वेळा दोन शिफ्ट्समध्ये कशा रीतीने बसवता येतील तसेच वर्क फ्रॉम होमच्या माध्यमातून किती विभागांना पूर्ण क्षमतेने काम करता येईल याचे तत्काळ नियोजन करण्याच्या सूचना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मुख्य सचिवांना मंगळवारी दिल्या. राजपत्रित अधिकारी महासंघाचे पदाधिकारी वर्षा येथे मुख्यमंत्र्यांना भेटले त्या वेळी ते बोलत होते.

मंत्रालयातील सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांचे फ्रंटलाइन कर्मचारी म्हणून प्राधान्याने लसीकरण करावे याबाबत नियोजन करण्याचे निर्देशही त्यांनी मुख्य सचिवांना दिले.याप्रसंगी महाराष्ट्र राजपत्रित अधिकारी महासंघाचे पदाधिकारी तसेच अधिकारी उपस्थित होते.

बातम्या आणखी आहेत...