आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

NEET, JEE:जेईई नीट परिक्षांसंदर्भात योग्य तो निर्णय घ्यावा; राहुल गांधी, अनिल देशमुखांसह अनेक नेत्यांची मोदी सरकारला विनंती

मुंबईएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक
  • सरकारनं यावर समाधानकारक आणि सर्वमान्य तोडगा काढावा - राहुल गांधी

राज्यभरात कोरोनाचा प्रादुर्भाव असताना परीक्षा घेण्याच्या विषयावर राजकारण चांगलेच तापलेले दिसत आहे. विद्यापीठाच्या अंतिम वर्षाच्या परीक्षेचा मुद्दा अजूनही मार्गी लागलेला नाही. दरम्यान आता जेईई आणि नीट परीक्षेचा विषयी ऐरणीवर आला आहे. या परिक्षांना काही तरी पर्यायी उपाय काढावा अशी मागणी देशभरातील नेत्यांकडून मोदी सरकारकडे केली जात आहे.

जेईई आणि नीट परिक्षांवरुन राहुल गांधी म्हणतात की, 'आज देशातील लाखो विद्यार्थी सरकारला काहीतरी सांगत आहेत. NEET-JEE परीक्षेबद्दल त्यांची मतं ऐकून घ्यायला हवीत आणि सरकारनं यावर समाधानकारक आणि सर्वमान्य तोडगा काढावा' असं राहुल गांधी यांनी म्हटलं आहे.

यासोबतच महाराष्ट्राचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनीही यासंदर्भात ट्विट केलं आहे. ते म्हणाले की, 'जेईई आणि नीट या परीक्षांचा विद्यार्थी आणि पालकांमध्ये प्रचंड तणाव आहे. #Covid19 च्या परिस्थितीमुळे विद्यार्थ्यांना तयारी करणे अवघड झाले आहे.या परीक्षा विद्यार्थ्यांच्या करियरच्या दृष्टीने महत्वाच्या आहेत.म्हणूनच विद्यार्थ्यांच्या त्रासाचा विचार करूनच केंद्र सरकारने निर्णय घ्यावा.'

देशभरातील कोरोना रुग्णांमध्ये सातत्याने वाढत आहे. अशात विद्यार्थ्यांची परीक्षा घेणे हे धोक्याचे ठरु शकते. मात्र 1 ते 6 सप्टेंबर दरम्यान जेईई व एनईईटी परीक्षा घेतली जाणार आहे. त्यामुळे राजकीय पक्षांनी परीक्षा घेण्याच्या निर्णयाचा पुनर्विचार करण्याचा सल्ला देण्यात आला आहे. काँग्रेसचे नेते राहुल गांधी, राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख, यासोबतच दिल्लीचे उपमुख्यमंत्री आणि आपचे नेते मनिष सिसोदिया यांनी ट्विट करून सरकारला परीक्षा रद्द करण्याचा सल्ला दिला आहे.