आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

क्रूझ ड्रग्ज प्रकरण:अटकेची ‘ती’ दृश्यफीत सार्वजनिक करा; नवाब मलिक यांची मागणी

मुंबई6 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

क्रूझ ड्रग्जप्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते व मंत्री नवाब मलिक यांनी आता थेट एनसीबीला आव्हान दिले आहे. या प्रकरणी शाहरुख खानचा मुलगा आर्यनसह इतरांना अटक केल्याचा व्हिडिओही जाहीर करावा, अशी मागणी त्यांनी रविवारी केली.

एनसीबीने कारवाईत ११ पैकी तिघांना सोडले. याचा व्हिडिओही जाहीर केला. ते तीन लोक कोण होते ते त्यांनी जाहीर करावे, असे मलिक म्हणाले. तुमच्या ऑफिसमधून ते लोक बाहेर पडतानाचे फुटेज जाहीर करा. भाजपच्या नेत्यांनी सांगितल्यानंतर ३ लोकांना सोडून देण्यात आले. ही कारवाई बनाव आहे, याचा मी पुनरुच्चार करतो, असे ते म्हणाले. एनसीबीच्या व्हिडिओत जप्ती क्रूझवर केलेली नाही. तो एनसीबी अधिकारी समीर वानखेडेंच्या कार्यालयातील आहे. मागचे पडदेही वानखेडेंच्या कार्यालयातील असल्याचा दावा मलिक यांनी केला. शुक्रवारी मलिक यांनी मोहित कुंभोज यांचे नाव घेऊन आरोप केले. रिषभ सचदेवा, प्रतीक गाबा, आमिर फर्निचरवाला यांना भाजप नेत्याचा फोन आल्यानंतर सोडल्याचा मलिक यांचा दावा आहे.

काही लोक मला १०० कोटींच्या नोटिसा पाठवणार आहेत. भाजपने माझी ब्रँड व्हॅल्यू १०० कोटी केली यासाठी मी आभार मानतो. मोहित कुंभोज मला भंगारवाला म्हणाले. माझे वडील आणि मीदेखील भंगारचा व्यवसाय केला. कायदेशीर व्यवसाय करण्याचा मला अभिमान आहे, मी कोणत्याही मार्केटला बुडवले नाही की सोन्याची तस्करी केली नाही, असा टोला मलिक यांनी लगावला.

बातम्या आणखी आहेत...