आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मुंबई:मखराम पवार यांच्या निधनाने बहुजन चळवळीतील एक खंदे नेतृत्व हरपले - काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले

मुंबई4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • उद्या सकाळी 11 वाजता लोहगड ता. बार्शिटाकळी येथे होणार अंत्यसंस्कार

काँग्रेसचे जेष्ठ नेते आणि माजी मंत्री मखराम पवार यांच्या निधनाची बातमी अत्यंत दुःखद आहे. मखराम पवार हे आयुष्यभर बहुजन समाजाच्या कल्याणासाठी लढले. त्यांच्या निधनाने बहुजन चळवळीतील एक खंदे नेतृत्व काळाच्या पडद्याआड गेले, अशा शोक भावना महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी व्यक्त केल्या आहेत.

शोकसंदेशात पटोले पुढे म्हणाले की, मखराम पवार यांनी बहुजन समाजातील लोकांना राजकीय प्रवाहात आणण्यासाठी प्रयत्न केले. राजकीय जीवनात त्यांनी विविध पदांचा उपयोग बहुजन समाजाच्या हितासाठी केला. विधानसभा व विधान परिषदेचे ते सदस्य होते. आघाडी सरकारमध्ये दारुबंदी प्रचार कार्य आणि खनिकर्म व पशूसंवर्धन खात्याचे कॅबिनेट मंत्री तसेच काँग्रेस पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष व पक्षप्रवक्ते अशा विविध पदांची जबाबदारी त्यांनी यशस्वीपणे पार पाडली.

मखराम पवार यांच्या निधनाने बहुजन समाजाची व काँग्रेसची मोठी हानी झाली आहे. मखराम पवार यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करून महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी पवार कुटुंबियांच्या दुःखात सहभागी आहे असे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले म्हणाले.

बातम्या आणखी आहेत...