आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Local
  • Maharashtra
  • Mumbai
  • Malegaon Bomb Blast | Marathi News | Devendra Fadnavis Shakes Hands With Accused In Malegaon Bomb Blast; Congress Will Send Thousands Of Letters

काँग्रेसचा सवाल:मालेगाव बॉम्बस्फोटातील आरोपींशी देवेंद्र फडणवीस यांचे हस्तांदोलन; काँग्रेस हजारो पत्रे पाठवणार

मुंबई6 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

शिवसेना नेते संजय राऊत यांनी भाजपच्या अनेक नेत्यांवर गंभीर आरोप केलेले असतानाच काँग्रेसने गुरुवारी जाहीर केलेल्या एका व्हिडिओने खळबळ उडाली आहे. विरोधी पक्षनेते आणि माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे मालेगाव बॉम्बस्फोटातील संशयित आरोपी कर्नल प्रसाद पुरोहित यांच्याशी हात मिळवत असतानाचा हा व्हिडिओ असून काँग्रेसचे सरचिटणीस सचिन सावंत यांनी तो प्रसिद्ध केला आहे.

व्हिडिओत विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस विवाह कार्यक्रमात आहेत. भाजप आमदार प्रसाद लाड यांच्या मुलीच्या विवाह समारंभातला हा अलीकडला व्हिडिओ आहे. त्या वेळी एक व्यक्ती येऊन फडणवीसांशी काहीतरी बोलते. त्यानंतर फडणवीस सुहास्य करतात, मान डोलावतात. क्षणार्धात उठून उभे राहतात. समोर एक पांढरा शर्ट घातलेली व्यक्ती येते. ते त्यांच्याशी हात मिळवतात. ही व्यक्ती मालेगाव बॉम्बस्फोटातील संशयित आरोपी कर्नल पुरोहित असल्याचा सावंत यांचा दावा आहे.

बहुत याराना लगता है: हा व्हिडिओ ट्वीट करताना सचिन सावंत यांनी ‘बहुत याराना लगता है’ अशा शब्दांत सवाल केला आहे. दरम्यान, कर्नल पुरोहित हे मालेगाव बॉम्बस्फोटातील संशयित आरोपी असून २९ सप्टेंबर २००८ रोजी मालेगावमध्ये बॉम्बस्फोट झाला होता. या दिवशी नमाजनंतर मशिदीत मोटारसायकलवर बॉम्बस्फोट झाला होता. यामध्ये ६ जणांचा मृत्यू झाला होता, तर १०० हून अधिक लोक जखमी झाले होते. याप्रकरणी एटीएसने प्राथमिक चौकशी केली होती. तीन वर्षांनंतर २०११ मध्ये हे प्रकरण एनआयएकडे वर्ग करण्यात आले. भोपाळमधील भाजप खासदार प्रज्ञा ठाकूर याही या प्रकरणात आरोपी होत्या. या प्रकरणातील अन्य आरोपींमध्ये लेफ्टनंट कर्नल पुरोहित, मेजर (निवृत्त) रमेश उपाध्याय, सुधाकर द्विवेदी आणि समीर कुलकर्णी यांचा समावेश आहे.

फडणवीसांना काँग्रेस हजारो पत्रे पाठवणार
महाराष्ट्राने कोरोना पसरवला, असा आरोप पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संसदेत करून महाराष्ट्राची बदनामी केली. हा महाराष्ट्राचा घोर अपमान आहे, या अपमानाबद्दल मोदींनी महाराष्ट्राची माफी मागावी या मागणीसाठी काँग्रेस आपल्या आंदोलनाचा पुढील टप्पा सुरू करणार आहे. त्या आंदोलनाचा भाग म्हणून शिवजयंतीदिनी मोदींना महाराष्ट्राची माफी मागायला सांगून आपल्या पापाचे प्रायश्चित्त करावे, अशा आशयाची हजारो पत्रे काँग्रेस कार्यकर्त्यांतर्फे फडणवीस यांच्यामार्फत मोदींना पाठवली जातील, अशी माहिती काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी दिली.

बातम्या आणखी आहेत...