आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मुंबई:मालेगाव बॉम्बस्फोट खटला; खासदार प्रज्ञा ठाकूर यांची हजेरी, पुढील सुनावणी 1 डिसेंबर रोजी

मुंबई3 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

सन २००८ च्या मालेगाव बॉम्बस्फोटातील आरोपी भोपाळच्या भाजप खासदार प्रज्ञा ठाकूर यांनी बुधवारी एनआयएच्या विशेष न्यायालयात हजेरी लावली. मुंबई येथील रुग्णालयात उपचार सुरू असल्याने खासदार ठाकूर या सुनावणीसाठी स्वत:हून उपस्थित राहिल्या, अशी माहिती त्यांच्या वकिलाने दिली.

यापूर्वी जानेवारी महिन्यात खासदार ठाकूर यांनी हजेरी लावली होती. न्यायमूर्ती पी.आर.सित्रे यांच्यासमोर हा खटला सध्या सुरू आहे. आपली तब्येत बरी नसल्याने कोकिलाबेन रुग्णालयात उपचार सुरू आहेत, असे प्रज्ञा ठाकूर यांनी सांगितले असता ज्या-ज्या वेळी समन्स बजावण्यात येईल तेव्हा हजर राहावे लागेल, असे न्यायालयाने स्पष्ट केले. या प्रकरणाची पुढील सुनावणी १ डिसेंबरपर्यंत तहकूब करण्यात आली आहे. २९ सप्टेंबर २००८ रोजी मालेगावातील मशिदीजवळ भीषण बॉम्बस्फोट झाला होता. यात सहा ठार तर सुमारे १०० वर जखमी झाले होते. मोटारसायकलवर स्फोटके गुंडाळण्यात आली होती. या मोटारसायकलची प्रज्ञा ठाकूर यांच्या नावाने नोंदणी होती. त्यामुळे त्यांनाही आरोपी करण्यात आले. या प्रकरणी ठाकूर यांच्याव्यतिरिक्त लेफ्टनंट कर्नल प्रसाद पुरोहित, चतुर्वेदी, कुलकर्णी व अजय राहिरकर ,निवृत्त मेजर रमेश उपाध्याय, सुधारक द्विवेदी हे आरोपी आहेत.

बातम्या आणखी आहेत...