आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे विधानभवनात वक्तव्य:मलिक देशद्रोही, हे म्हणणे गुन्हा असेल तर 50 वेळा करेन

मुंबईएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

देशद्रोही हा शब्द मी नवाब मलिक यांच्यासाठी वापरला होता. अजित पवार, अंबादास दानवे किंवा इतर कोणत्याही आमदाराला देशद्रोही म्हटले नाही. देशद्रोही व्यक्तीला ‘देशद्रोही’ म्हणणे हा गुन्हा असेल, तर तो ५० वेळा करेन. मी माझ्या वक्तव्यावर ठाम अाहे, असे सांगत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपले वक्तव्य मागे घेण्यास नकार दिला. अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला मुख्यमंत्र्यांच्या चहापानावर विरोधकांच्या बहिष्काराचा संदर्भ देत देशद्रोह्यांसोबत चहापान टळले तरे बरं झाले, असे वक्तव्य मुख्यमंत्र्यांनी केले होते. याबद्दल अंबादास दानवे यांनी हक्कभंग प्रस्ताव मांडला होता.

बातम्या आणखी आहेत...