आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राष्ट्रवादाचे सत्य:कुरुलकरांचा लहानपणापासून RSS शी संबंध; काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगेंनी व्हिडिओ आणला समोर

मुंबई16 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

पाकिस्तानला भारतीय गोपनीय माहिती पाठवल्याचा आरोप असणाऱ्या डीआरडीओचे (संरक्षण संशोधन आणि विकास संस्था) संचालक डॉ. प्रदीप कुरुलकर यांचा लहानपणापासूनच राष्ट्रीय स्वयंसेवक संघांशी संबंध होता, असा दावा काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी केला आहे. तसेच त्यांनी प्रदीप कुरुलकर आणि सरसंघचालक मोहन भागवत यांचा एक व्हिडिओ ट्विट करत भाजपच्या राष्ट्रवादावरही हल्लाबोल केला.

सध्या प्रदीप कुरुलकर दहशतवादविरोधी पथकाच्या कोठडीत आहेत. त्यांनी हनीट्रॅपमध्ये अडकून भारताची गोपनीय माहिती पाकिस्तानला पाठवल्याचा आरोप आहे. त्यांच्यासोबत इतर अधिकारीही यात गुंतल्याचा संशय व्यक्त होतोय.

खरगे काय म्हणतात?

मल्लिकार्जुन खरगे आपल्या ट्विटमध्ये म्हणतात की, 'जे लोक सध्या आम्हा भारतीयांना रोज 'गो टू पाकिस्तान, गो टू पाकिस्तान' म्हणून धमकावतात. आता ते स्वतःच पाकिस्तासाठी हेरगिरी करताना पकडलेले गेलेत. हे आहे मी देशाला झुकू देणार नाही, असे म्हणणाऱ्यांच्या राष्ट्रवादाचे सत्य,' असे म्हणत त्यांनी राष्ट्रवादीय स्वयंसेवक संघ आणि भाजप दोघांवरही शरसंधान साधले आहे.

भागवतांसोबत व्यासपीठावर ...

मल्लिकार्जुन खरगे यांनी प्रदीप कुरुलकर यांचा एक व्हिडिओ शेअर केला आहे. हा व्हिडिओ जुना असल्याचे समजते. त्यात व्यासपीठावर सरसंघचालक मोहक भागवत आहेत. तर त्याच व्हिडिओमध्ये कुरुलकर यांची मुलाखत घेतलेली आहे.

मुलाखतीत म्हणतात की...

मुलाखतीमध्ये कुरुलकर म्हणतात की, 'माझ्या कुटुंबाच्या चार पिढ्या या संघाशी संबंधित आहेत. सध्या माझ्या मुलगा संघात आहे. मी ही काही काळ होतो. माझे आजोबा शाखेत जायचे. स्वयंसेवक म्हणून काम करायचे. त्यांचे गणित, हिशोब चांगला होता. शाखेची गंगाजळी, हिशेब, टिपणे ते ठेवत. त्यानंतर माझ्या वडिलांकडे हे काम आले. पुण्याच्या शाखेत मी 1982 ते 1996 या काळात सॅक्सोफोन वाजवायचो,' असा उल्लेखही ते करतात.

भुजबळ म्हणतात की...

'आरएसएस' संघटनेवर कोणी देशद्रोहाचा आरोप करू शकत नाही. करू नये, असे म्हणत राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ यांनी प्रदीप कुरुलकर प्रकरणी आपले परखड मत व्यक्त केले आहे. भुजबळ म्हणाले की, 'आरएसएस' संघटनेवर कोणी देशद्रोहाचा आरोप करू शकत नाही. करू नये. मात्र, 'आरएसएस'मध्ये आहे, असे सांगून असे जे काही धंदे करणारे लोक आहेत त्यांच्यावर 'आरएसएस'ने नजर ठेवली पाहिजे. पोलिस, गुप्तहेर शाखांनी अधिक दक्ष राहण्याची आवश्यकता आहे. कोण कधी, अशा काही हनी ट्रॅपमध्ये सापडेल सांगता येत नसल्याचेही ते म्हणाले.

संबंधित वृत्तः

कुरुलकरांच्या कॉल लिस्टमधून संशयित अधिकाऱ्याचे नाव समोर, हनीट्रॅपमध्ये अडकल्याची शक्यता; 'ATS'चा तपास सुरू

'आरएसएस'वर कोणी देशद्रोहाचा आरोप करू शकत नाही; 'कुरुलकर'प्रकरणी छगन भुजबळांचे रोखठोक मत