आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मिशन बिगिन:राज्यात मॉल उघडलेत, मग मंदिरे का नाहीत; राज ठाकरेंचा सवाल

मुंबईएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • त्र्यंबकेश्वरमधील 10 पुजाऱ्यांनी साेमवारी राज ठाकरे यांची त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली

राज्यात मॉल सुरू झाले आहेत. इतर गोष्टी सुरू करण्यात आल्या आहेत. मग मंदिरे का उघडली जात नाहीत, असा सवाल मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केला आहे. राज्यात मिशन बिगिनअंतर्गत सर्वच गोष्टी सुरू होत आहेत. मात्र, मंदिरे सुरू करण्यात आलेली नाहीत.

मंदिरे बंद असल्याने छोट्या व्यावसायिकांवर उपासमारीची वेळ आली आहे. या पार्श्वभूमीवर त्र्यंबकेश्वरमधील १० पुजाऱ्यांनी साेमवारी राज ठाकरे यांची त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली. सुमारे १५ मिनिटे ही बैठक चालली. ठाकरे यांनी मंदिरे सुरू करण्यावर सकारात्मकता दाखवतानाच त्यानुषंगाने निर्माण होणाऱ्या समस्यांवरही बोट ठेवले. मंदिरे खुली झाली पाहिजेत. मॉल सुरू होतात, मग मंदिरे का सुरू होत नाहीत? शासकीय नियमांचे पालन करूनच मंदिरे खुली व्हावीत. पण मंदिरे सुरू केल्यानंतर भाविकांची गर्दी कशी रोखाल? कोरोनाचा संसर्ग पसरू नये म्हणून गर्दीवर कसे नियंत्रण आणाल? असे काही प्रश्नही त्यांनी उपस्थित केले. कालच राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी मंदिरे सुरू करण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे म्हटले होते. मंदिरे आणि धार्मिक स्थळे लोकांसाठी सुरू व्हावीत असे माझेही म्हणणे असल्याचे राज ठाकरे म्हणाले.

बातम्या आणखी आहेत...