आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ममता बॅनर्जी-शिवसेना नेत्यांमध्ये बैठक:आदित्य ठाकरे आणि संजय राऊत यांनी घेतली मुख्यमंत्री ममता बॅनर्जींची भेट; भेटीनंतर आदित्य ठाकरे म्हणाले...

2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी तीन दिवसांच्या महाराष्ट्र दौऱ्यावर आहेत. आज त्यांचे मुंबई येथे आगमन झाले. ममता बॅनर्जी यांनी आज मुंबई सिद्धिवीनायक मंदिरात जाऊन दर्शन घेतले.

दर्शन घेऊन बाहेर आल्यावर त्यांनी 'जय मराठा, जय बांग्ला' अशी घोषणा दिली. प्रसारमाध्यमांशी बोलताना त्या म्हणाल्या, 'मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या प्रकृतीला आराम मिळावा यासाठी आपण मुंबई सिद्धिविनायकाकडे प्रार्थना केली. मुंबई दौऱ्यात ममता बॅनर्जी यांनी मुंबईवरील दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या तुकाराम आंबोळे यांच्या पुतळ्यालाही अभिवादन केले.

आदित्य ठाकरे, संजय राऊत ममता बॅनर्जींच्या भेटीला

राज्याचे पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे आणि शिवसेना खासदार संजय राऊत यांनी ममता बॅनर्जी यांची भेट घेतली. दरम्यान, ममता बॅनर्जी यांच्याशी आमची जुनी मैत्री आहे ती पुढे नेण्यासाठीच मी त्यांना आज भेटलो, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे पुत्र आणि महाराष्ट्राचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी ममता बॅनर्जी यांच्या भेटीनंतर पत्रकारांना सांगितले.

आम्ही येथे ममता बॅनर्जी यांचे स्वागत करण्यासाठी आलो आहोत. त्या दोन-तीन वर्षांपूर्वी मुंबईत आल्या होत्या. तेव्हा देखील आमची भेट झाली होती. आमच्यात मैत्री संबंध आहेत ती मैत्री पुढे नेण्यासाठीच आजची भेट होती, असे आदित्य ठाकरे यांनी स्पष्ट केले.

तीनही नेत्यांमध्ये जवळपास अर्धा तास चर्चा झाली. मात्र या बैठकीत कोणतीही राजकीय चर्चा झाली नसून, ममता बॅनर्जी जेव्हाही मुंबई दौर्‍यावर असतात त्यावेळेस उद्धव ठाकरे हे त्यांची भेट घेतात. मात्र त्यांच्यावर सुरू असलेले उपचार आणि ते स्वतः बायोबबलमध्ये असल्याकारणाने ही भेट होऊ शकलेली नाही. पश्चिम बंगाल आणि महाराष्ट्र या दोन्ही राज्यांमध्ये चांगला संवाद आहे. महत्वाच्या प्रत्येक मुद्द्यावर ह्या दोन्ही राज्यात संवाद होत असतो. खास करून कोविड परिस्थितीमध्ये देखील या दोन्ही राज्याने चांगला सुसंवाद ठेवला असल्याचे आदित्य ठाकरे यांनी सांगितले.

बातम्या आणखी आहेत...