आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

ई-ट्रॅव्हल पास:बोगस ई-ट्रॅव्हल पास बनवून देणाऱ्या टोळीचा पर्दाफाश, मुंबईत एकाला अटक

मुंबईएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक

बोगस ई-ट्रॅव्हल पास विक्री करणाऱ्या रॅकेटचा गुरुवारी उपनगर चेंबूर पोलिसांनी पर्दाफाश केला. याप्रकरणी एकाला अटक करण्यात आली आहे. तर एकजण फरार आहे. 

पोलिस अधिकाऱ्याने सांगितले की, डोंगरी पोलिसांना खबऱ्यांकडून माहिती मिळाली होती की, काही जण महाराष्ट्रात फिरण्यासाठी लागणारे बोगस ई-ट्रॅव्हल पास 5 हजार रुपयांना विकत आहेत.

याप्रकरणी मनोज रामु हुंबे या आरोपील पोलिसांनी ताब्यात घेतले. चौकशीदरम्यान त्याने कबुल केले की, त्याने त्याच्या साथीदारांसोबत मिळून नवी मुंबई पोलिस कमिश्नर आणि पालघर जिल्हाधिकाऱ्यांच्या नावाने बनावट पास तयार करुन त्यांची विक्री केली. याप्रकरणी आरोपीविरोधात भा.दं.वि. कलम 420 (फसवणू),465 (बनावट कागदपत्रे) आणि माहिती तंत्रज्ञान कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल केला असून, पुढील तपास पोलिस करत आहेत.

बातम्या आणखी आहेत...