आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मुंबई:मांघर देशात पहिले मधाचे गाव

मुंबई2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

राज्य शासनाच्या राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळाच्या वतीने नावीण्यपूर्ण उपक्रम म्हणून मधाचे गाव ही महत्त्वपूर्ण संकल्पना राबवण्यात येत आहे. यासाठी महाबळेश्वरनजीक असलेल्या मांघर गावाची मधाचे गाव म्हणून निवड करण्यात आली आहे.

देशातील हा पहिलाच प्रकल्प असून राज्यातील इतर जिल्ह्यांतदेखील हा प्रकल्प राबवला जाणार आहे. मधमाशा संवर्धनासोबत निसर्ग संवर्धनासाठी हा प्रकल्प उपयुक्त ठरेल. मांघर हे महाबळेश्वरपासून ८ किलोमीटर अंतरावर डोंगर कड्याखाली वसलेले गाव आहे. गावाच्या भोवताली घनदाट जंगल असून या ठिकाणी वर्षभर फुलोरा असतो. गावात सामूहिक मधमाशांचे संगोपन केले जाते. मधमाशांच्या परपरागीकरणामुळे पिकांची उत्पादकता वाढ झाल्याचे आढळून आले आहे. गावातील ८० टक्के लोकसंख्या मधमाशापालनाचा व्यवसाय करतात.

निसर्गाचे संरक्षण, संवर्धन केले जाणार : या गावात मधमाशांची संख्या वाढविण्यासाठी विशेष प्रयत्न केले जाणार आहेत. महाबळेश्वराला येणाऱ्या पर्यटकांना व ग्राहकांना शुद्ध व दर्जेदार मध मिळेल. गाव हे निसर्गाचे संरक्षण, संवर्धन करण्याबरोबरच येथील लोकांसाठी रोजगार मिळणारा प्रकल्प ठरेल.

बातम्या आणखी आहेत...