आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ओबीसी आरक्षण:आगामी निवडणुकांसाठी ओबीसी आरक्षणत चालढकल : फडणवीस

पुणे2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • बैलगाडी शर्यतीसाठी पाठपुरावा

ज्येष्ठ नेते खासदार शरद पवार यांना देशभरातील ओबीसी आरक्षणची परिस्थिती माहिती असून सर्वत्र ओबीसी आरक्षण सुरू आहे. केवळ महाराष्ट्रातील ओबीसी राजकीय आरक्षण गेलेले असून इतर काेणत्याही राज्यातील गेलेले नाही. मात्र राज्यातील महानगरपालिका, नगरपालिका, जिल्हा परिषद निवडणुका हाेत नाही ताेपर्यंत ओबीसी आरक्षण देण्याबाबत राज्य सरकारला चालढकल करावयाची असल्याने ते वेगवेगळी कारणे सांगत आहेत, अशी टीका विराेधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी पुणे विमानतळ येथे पत्रकारांशी बाेलताना केली.

ओबीसी अायाेगाने स्वत: राज्य सरकारला पत्र पाठवून सांगितले अाहे की, इम्पिरिकल डाटा करण्यासाठी अाम्हाला पैसे द्या, इम्पिरिकल डाटा गाेळा करणे महत्त्वाचे अाहे. मराठा अारक्षणवेळी अाम्ही केवळ चार महिन्यांत राज्यातील इम्पिरिकल डाटा जमा केला हाेता. सरकारच्या मनात असेल तर अाेबीसींचा इम्पेरिकल डाटा जमा केला जाऊ शकताे. परंतु तशी मानसिकता राज्य सरकारची दिसून येत नाही,असे फडणवीस म्हणाले.

बैलगाडी शर्यतीसाठी पाठपुरावा
बैलगाडी शर्यती सुरू करण्याबाबत भाजप सरकार असताना कायदा केला. परंतु दुर्दैवाने सर्वाेच्च न्यायालयाने त्यास स्थगिती दिली. त्यासाठी केंद्र सरकारकडे पाठपुरावा करू, असे ते म्हणाले.

बातम्या आणखी आहेत...