आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराजातीचे खोटे प्रमाणपत्रे सादर करून खासदार झालेल्या नवनीत राणा पापक्षालन करणार का? असा सवाल ठाकरे गटाच्या प्रवक्त्या मनिषा कायंदे यांनी भाजप खासदार नवनीत राणा यांना विचारला आहे. तसेच हिंमत असेल तर हनुमान चालिसा म्हणण्याची स्पर्धा माझ्यासोबत लावा, असे चॅलेंज दिले आहे.
नवनीत राणा यांनी काल उद्धव ठाकरेंवर मोठ्या प्रमाणावर आरोप केले. त्यांनी केलेल्या टीकेला मनिषा कायंदे यांनी त्यांच्याच शब्दात उत्तर दिले आहे. तसेच नवनीत राणा यांना हनुमान चालिसा म्हणण्याचे खुले आव्हानही दिले आहे.
आत्मक्लेश करणार का?
मनिषा कायंदे म्हणाल्या, जातीचे खोटे प्रमाणपत्रे सादर करून खासदार झालेल्या नवनीत राणा पापक्षालन करणार का? एका मागासवर्गीय व्यक्तीचा अधिकार हिरकावून घेऊन तुम्ही खासदार झालात याचे पापक्षालन करणार का? आज तुमच्या वाढदिवसाच्या दिवशी त्याची होळी करून आत्मक्लेश करणार का? असा थेट सवाल त्यांनी विचारला आहे.
उद्धव ठाकरेंच्या नादी लागू नका
मनिषा कायंदे म्हणाल्या, हनुमान चालिसाच्या नावाखाली तुम्ही मागच्या वर्षी मुंबईत गोंधळ घातला. ती हनुमान चालिसा तरी तुम्हाला पूर्णपणे पाठ झाली का, माझ्याशी स्पर्धा लावायची तयारी आहे का, असेल तर सांगा विनाकारण उद्धव ठाकरेंच्या नादी लागू नका.
बुडबुडयानी आम्हाला शिकवू नये
मनिषा कायंदे म्हणाल्या, खरे तर गोमूत्र शिंपडून पवित्र करण्याची अमरावती मतदारसंघात जास्त गरज आहे. राहता राहिला हनुमान चालीसाचा प्रश्न. अशा बुडबुडयानी आम्हाला शिकवू नये. दोन वर्षात हनुमान चालीसा पाठ झाली का? आहे का आमनेसामने म्हणण्याची हिम्मत? असे म्हणत मनिषा कायंदेंनी नवनीत राणा यांना डिवचले आहे.
काय म्हणाल्या नवनीत राणा?
नवनीत राणा म्हणाल्या, उद्धव ठाकरेजी तुम्ही सोन्याच्या ताटामध्ये मोठ्या घरात जन्म घेतला. मात्र, आमच्या देवावरचा विश्वास कोणीही संपवू सकत नाही. तुम्ही अत्याचार केला असेल, लोक तुमच्या नावाने घाबरत असतील. मात्र, नवनीत राणा, रवी राणा देवाला माननारे आहेत. आम्हाला हनुमंताचा आशीर्वाद आहे. आम्हाला कुणाचीही भीती नाही. माझ्यावर अत्याचार करून जेलमध्ये टाकले. जेलमध्ये दुसऱ्या महिलांना चार वेळेला पाणी मिळायाचे. मला एकदाही मिळायचे नाही. पण मला ते तोडू शकले नाहीत.
संबंधित वृत्त
टीकास्वयंवर:उद्धव ठाकरेंनी माणुसकी गाडली
माझ्यावर अत्याचार करून मला जेलमध्ये टाकले. तिथे दुसऱ्या महिलांना चार-चार वेळेस पाणी प्यायला मिळायचे. मला एकदाही प्यायला पाणी मिळाले नाही, असा आरोप खासदार नवनीत राणा यांनी केला. यावेळी त्यांना अश्रू अनावर झाले. त्या अमरावतीमध्ये आयोजित हनुमान जन्मोत्सव सोहळ्यात बोलत होत्या. यावेळी आमदार रवी राणा आणि कार्यकर्त्यांसह त्यांनी हनुमान चालिसाचे पठण केले. वाचा सविस्तर
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.