आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पोस्टरबाजीतून भाजपने शिवसेनेला डिवचले:आपले सरकार आले, हिंदू सणांवरचे विघ्न टळले!; शिवसेनेचाही थिल्लरपणा म्हणत पलटवार

मुंबईएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

आपले सरकार आले, हिंदू सणांवरचे विघ्न टळले, अशी जाहिरातबाजी मुंबईतल्या बेस्ट बसवर भाजपने केली आहे. यावरून शिवसेना विरुद्ध भाजप असे जोरदार आरोप-प्रत्यारोप रंगले आहेत.

शिवसेना नेत्या मनीषा कायंदे यांनी याचा जोरदार समाचार घेत, हा भाजपचा थिल्लरपणा असल्याचे म्हटले आहे.

नेमके प्रकरण काय?

मुंबईतील बेस्ट बसेसवर भाजपने जाहिराती लावण्यात आल्या आहेत. या जाहिरातींवर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे छायाचित्र झळकत आहेत. यावर 'हिंदू सणांवरील विघ्न टळले, गणपती बाप्पा मोरया' अशा आशयाचा उल्लेख करण्यात आला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे छायाचित्र झळकत आहेत. बेस्ट बसेससह बसस्टॉपवरही या जाहिराती लावण्यात आल्या आहेत. या जाहिरातीवरून विरोधकांनी भाजपला लक्ष्य केले आहे.

व्हिडीओतून केली टीका

मनीषा कायंदे यांनीव्हिडीओ ट्विट करत टीका केली. व्हिडीओमध्ये त्यांनी म्हटले की, भाजपकडून सार्वजनिक मालमत्ता असलेल्या बेस्टच्या बसेसेवर 'आपले सरकार आले, हिंदू सणांवरचे विघ्न टळले' अशा आशयाची जाहिरातबाजी केली आहे. यापेक्षा कोणताही थिल्लरपणा असू शकत नाही.

कोरोना जागतिक महामारी

कायंदे यांनी पुढे म्हटले की, कोरोना ही एक जागतिक महामारी होती. त्यामुळे संपूर्ण जग थांबले होते. वैज्ञानिक आणि डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार त्यावेळी उद्धव ठाकरेंनी नागरिकांवर निर्बंध लावले होते. त्यानंतर हळूहळू हे निर्बंध शिथिल देखील करण्यात आले होते. पण, महामारीच्या काळात भाजपने सातत्याने निर्बंधाविषयी आरडाओरडा केला.

भाजपचा बेजबाबदारपणा

कायंदे पुढे म्हणाल्या की, महामारीत अत्यंत बेजबाबदारपणा भाजपने दाखवला. कोरोना निर्बंध उठवण्यासाठी भाजपकडून सातत्याने आंदोलने करण्यात आली. या आंदोलनांमुळेच राज्यात कोरोनाचा जास्त प्रसार झाला, असा आरोपही कायंदे यांनी केला.

बातम्या आणखी आहेत...